आषाढी एकादशीला गुरुदेवनगरात रंगली भक्तिगीतसंध्या

सूरसागर कलाक्षितिज नागपूरची प्रस्तुती

0

बहुगुणी डेस्क, नागपूरः आषाढी एकादशीच्या औचित्याने गुरुदेवनगर येथे भक्तिगीतसंध्या रंगली. इंजि. सागर राऊत संचालित ‘सूरसागर कलाक्षितिज’द्वारा ‘‘भक्तिरंग पांडुरंग’’ या कार्यक्रमात पंकज रंगारी, नीतेश चावरे, सागर राऊत यांनी विविध विविध भक्तिगीतांचा नजराणा पेश केला.

तबल्याची साथ शशी परमार यांनी केली. तालाची साथ अंशूल उरकुडे यांनी केली. ‘‘भक्तिरंग पांडुरंग’’ या कार्यक्रमाचे निरुपण सुनील इंदुवामन ठाकरे यांनी केले. सूरज राऊत व परिमल खोब्रागडे यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.

आरंभी गणेशवंदना झाली. तू सुखकर्ता, गजानन श्री गणराया आदी गीतानंतर एकादशीनिमित्त विविध भक्तिगीत सादर झालेत. मालकंस रागावर आधारीत श्रीनिवास खळे यांनी संगितबद्ध केलेलं ‘‘सावळे सुंदर रूप मनोहर’’ हे पद पंकज यांनी गायलं.

भीमपलास रागावरील आधारित ग. दि. माडगुळकरांची रचना ‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी’ श्रोत्यांच्या विशेष पसंतीस पडले. संत ज्ञानेश्वर, संत चोखोबा, संत नामदेव, संत कान्होपात्रा, संत एकनाथ आदी संतपदांनी रसिकांना प्रासादिक आस्वाद मिळाला. विठेवरी उभा, देवाचीये द्वारी, टाळ बोले चिपळीला, विठ्ठला, कानडा राजा पंढरीचा अषा अनेक भक्तिगीतांनी मैफली रंगली. इंजि. सागर राऊत यांनी सादर केलेल्या अभंग आणि गजराने उपस्थितांना तृप्त केले. माझे माहेर पंढरी व अनेक भक्तिगीतांनी मैफलीचा रंग चढताच राहिला. मंदिराच्या विश्वस्तांसह अनेकांनी या कार्यक्रमास हजेरी लावली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.