रोहण आदेवार, मारेगाव: विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल ऍण्ड ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स मारेगावने गुरुपौर्णिमेला शहरात वारकरी शोभयात्रा काढली.
या शोभायात्रेत वेदिका थेरे, क्रिश निरगुडवार हे विठ्ठल रुखमाईच्या वेशभूषेत होते. संत तुकारामांची वेशभूषा आकाश पुनवटकरने साकारली. विघ्नेश दुर्गे, रोहण भोयर, आर्यन लोहे, वेदांत गजभिये, भूपेंद्र धेंगळे कु.नेहा हुसकुले, अचल पवार यांनी विविध संतांची वेशभूषा साकारून त्यांचे विचार मांडले.
या शोभयात्रेत शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा साकारून हरिनामाच्या गजरात मारेगावात पंढरपूर साकारले. ‘जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन’ हा संदेश अखंड राहण्यासाठी सर्व संतविचारांचा वारसा मारेगाववासीयांसमोर मांडला.
शोभयात्रेस संस्थेच्या अध्यक्षा संध्या राजेश पोटे यांनी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका जोत्स्ना ल. बोँडे यांच्या मार्गदर्शनात या शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले. सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शोभयात्रेच्या यशस्वीतेकरित्या परिश्रम घेतले.