जागतिक आदिवासी दिनानिमित्त बाईक रॅली व रक्तदान शिबिर
विवेक तोटेवार, वणी: 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त वणीत सामाजिक संघटनेद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन आदिवासी मित्र पुरस्कार प्राप्त व दिडशेच्यावर आदिवासी गाव दत्तक घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा व डाॅ.सुनील जुमनाके यांनी केले.
सकाळी 9 वाजता पाण्याच्या टाकीजवळील भिमालपेन देवस्थान येथून भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शेकडो लोक सहभागी झाले होते. ही रॅली टिळक चौक ते जिजाऊ चौक चिखलगाव, लोकमान्य टिळक महाविद्यालय, गांधी चौक, दिपक टाॅकीज, आंबेडकर चौक या प्रमुख मार्गाने रॅली निघाली. या रॅली मध्ये जय सेवा बिरसा मंडा की जय चे जय जयघोषाने शहर दुमदुमले होते. रॅलीचा समारोप भिमालपेन देवस्थान इथे झाला.
रॅलीनंतर रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. वणीतील सुगम हॉस्पिटल व लाईफलाईन ब्लड बँकेच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात 150 लोकांनी रक्तदान केले. रक्तदान केल्यानंतर रक्तदात्याला एक टिशर्ट, प्रमाणपत्र व डोनर कार्ड वाटण्यात आले.