झरी तालुक्यात ग्रामविद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्त्या रडखल्या

अर्ज सादर होऊनही नियुक्त्या थंड बस्त्यात

0

सुशील ओझा, झरी: गावात निर्माण होणा-या विद्युत विषयक समस्येचा गावातच निपटारा व्हावा या उद्देशाने ग्रामविद्युत व्यवस्थापाकांच्या नियुक्त्या ग्रामपंचायतीद्वारा करण्यात येते. परंतू, तालुक्यातील ग्राम विद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्तया रखडल्या आहे. याकडे सरपंच व सचिव दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. .

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने २० ऑक्टोबर २०१६ रोजी आदेश निर्ममीत करून तालुक्यातील प्रत्येक गावात ग्राम विद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्त्या कराव्या असे ग्रामपंचायतींना सूचित करण्यात आले होते. या आदेशानुसार तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींना ग्रामपंचायतीच्या फलकावर सूचना लावण्यातही आल्या होत्या. तर गावातून ग्राम विद्युत व्यवस्थापकासाठी ग्रामपंचायतींना अर्ज सादर करण्यातही आले होते. मात्र अजूनही सरपंच व सचिवांच्या दुर्लक्षीत धोरणामुळे सदर नियुक्त्या थडबसत्यात असल्याचे दिसून येत आहेत.

दिवसेंदिवस अनेक गावांत विजेची समस्या वाढत आहेत. अशावेळी ग्रामविकास विभागाने निर्गमित केलेल्या ग्राम विद्युत व्यवस्थापकाकडून नागरिकांना अपेक्षा होत्या. परंतु नियुक्त्याच रडखल्या असल्याने समस्यात वाढत आहे. वीज वितरण कंपनीकडे कर्मचारी कमी आहे. त्यामुळे ग्रामविद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्तीमुळे वीजेची समस्या निकाली लावण्यास सहकार्य होईल, अशी अपेक्षा होती. मात्र नियुक्त्या थंडबसत्यात पडल्या असल्याचे दिसत आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन सदर नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.