15 ऑगस्टला देशभक्ती गितांवर नृत्य स्पर्धा

बक्षिसांची भरगोस लूट, एकल आणि गृप डान्स स्पर्धा

0

बहुगुणी डेस्क, वणी: वणीमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त 15 ऑगस्ट बुधवारी एसबी लॉनमध्ये दुपारी 11.30 ते 4 दरम्यान देशभक्ती गाण्यांवर नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा एकल आणि गृप अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. द दिम क्रु डान्स स्टुडिओ आणि रोटरी क्लबद्वारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रत्येक गटातील तीन विजेत्यांना अनुक्रमे 5 हजार एक, 3 हजार एक व 2 हजार एक रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. सोबतच स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहे. स्पर्धकांनी कार्यक्रम सुरू होण्याच्या अर्धा तास आधी स्पर्धेच्या ठिकाणी यायचे आहे. आयोजकांकडून येणा-या प्रेक्षकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कार्यक्रमाला स्पर्धकांनी आणि प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष अंकुश जयस्वाल, सचिव विनोद खुराणा यांच्या मार्गदर्शनात सुधीर साळी, संजय छाजेड, गौरव जोबनपुत्रा, मयुर गेडाम, मयुर गोयंका, सचिन आत्राम आणि सदस्य परिश्रम घेत आहे. अधिक माहिती साठी सुधीर साळी 9049007722, संजय छाजेड, 9881725437, मयुर गेडाम 7875455363 यांना संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.