स्वरमधुरा संगीत विद्यामंदिराचा वार्षिकोत्सव रविवार19 रोजी

0

बहुगुणी डेस्क, नागपूरः स्वरमधुरा संगीत विद्यामंदिराचा वार्षिकोत्सव रविवारी सायंकाळी 6 वाजता होत आहे. दत्तात्रेयनगर येथील शिवाजी हॉल येथे विद्यामंदिराचे विद्यार्थी हे विविध गायन, वादन, नृत्य आदी कलांचे सादरीकरण करतील. श्रीमती बिंझाणी महिला महाविद्यालयाच्या संगीत विभागाच्या प्रा. डॉ. वैशाली उपाध्ये तसेच भारत विकास परिषदेचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री श्री. पद्माकर धानोरकर यांच्या उपस्थितीत हा वार्षिकोत्सव होईल.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

नांदी, भरतनाट्यमचे तोडे, शास्त्रीय व सुगम गायन, नृत्य, असा विविधांगी हा कार्यक्रम राहील. सुनील इंदुवामन ठाकरे या कार्यक्रमाचं संचालन करतील. या वार्षिकोत्सवाला उपस्थित राहण्याची विनंती संस्थेच्या संचालिका प्रा. स्वाती नरेंद्र नवघरे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.