विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची शहर आणि तालुका कार्यकारणी गठीत

0
विलास ताजने, मेंढोली : वणी येथील विवेकानंद विध्यालयात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची सभा नुकतीच पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी जनता विध्यालयाचे मुख्याध्यापक एस. टी. बरडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विमाशिचे प्रांतीय उपाध्यक्ष अरविंद देशमुख, माजी प्रांतीय उपाध्यक्ष व्ही.बी. टोंगे, जिल्हा अध्यक्ष अशफाक खान, जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे, एम.डी. धनरे, मनोज जिरापुरे, जिल्हा कार्यवाह विजय खरोडे, जिल्हा संघटक दिवाकर नरुले, अशोक आकुलवार, गोविंद ठावरी, संजय देवाळकर, प्रभू गुंडेवार उपस्थित होते.
यावेळी अरविंद देशमुख, अशफाक खान यांच्यासह प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अरविंद देशमुख यांनी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी, सध्यस्थीती आणि अंशदायी निवृत्ती वेतन योजना याविषयी मार्गदर्शन केले. अशफाक खान यांनी अतिरिक्त शिक्षकांचे प्रश्न व समस्येवर चर्चा केली. उपस्थित इतर पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची शहर व तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. वणी शहराध्यक्ष पदी नुसाबाई विध्यालय वणीचे भुपेंद्र देरकर, उपाध्यक्षपदी प्रकाश सिडाम, प्रितेश लखमापुरे, धनराज काथवटे, अनिता टोंगे, कार्यवाह प्रमोद उरकुडे, सहकार्यवाह विठ्ठल पडलवार, अशोक पालावार, पवन निब्रड, गजानन टेम्बुर्डे, कोषाध्यक्ष दौलत घुगूल, संघटक संतोष बेलकार, बबन लखमापुरे तर प्रसिद्धी प्रमुख पदी रवींद्र उलमाले यांची निवड करण्यात आली.
तालुका अध्यक्षपदी विवेकानंद विध्यालय वणीचे किशोर बोढे, उपाध्यक्ष दिलीप गोहोकार, रवींद्र गोखरे, प्रमोद थेरे, सुनिल लखमापुरे, कार्यवाह दत्तू महाकुलकर, सहकार्यवाह अशोक काळे, मोतीराम परचाके, प्रवीण लखमापुरे, वंदना शंभरकर, कोषाध्यक्ष नथु जेऊरकर, संघटक बबन लखमापुरे, उमाकांत म्हसे तर प्रसिद्धी प्रमुखपदी विलास ताजने यांची निवड करण्यात आली. प्रास्ताविक रामकृष्ण जिवतोडे तर संचालन गंगाधर गेडाम यांनी केले. आभार दिवाकर नरुले यांनी मानले. सभेला बहुसंख्य शिक्षकांची उपस्थिती होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.