सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे बैलपोळ्याचे आयोजन करण्यात आले. पोळ्यात उत्कृष्ट सजावट असलेल्या बैलजोडीला ग्रामपंचायतच्या वतीने पुरस्कार देण्यात आला.
यात पहिला क्रमांक हनुमान कल्लूरवार यांचा आला. त्यांना ५००१ रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तर दुसरा क्रमांक उल्हास मंदावार यांनी पटविकाला असून ३००१ रुपये देण्यात आले. तिसऱ्या क्रमांकाचे २००१ रुपये बक्षीस हनमंतू बाजनलावार यांना देण्यात आले. चौथ्या क्रमांकाचे प्रोत्साहनपर बक्षीस ५०१ रुपये रमेश पुल्लीवार यांना देण्यात आले.
बक्षीस सरपंच शंकर लाकडे, उपसरपंच अरुण आगुलवार, ठाणेदार धनंजय जगदाळे व पोळा समितीच्या हस्ते देण्यात आले. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
पोळ्यात आणलेल्या बैलजोडीचे परीक्षण अध्यक्ष सुधाकर आसुटकर, गजानन उत्तरवार, मधुकर गादेवार, बापुराव पल्लीवार, चक्रधर तीर्थगिरीकर, सत्तार गुरुजी, दिवाकर ताडूरवार, श्रीहरी बरशेट्टीवार, दीपक बरशेट्टीवार, भुमारेड्डी बाजनलावार, मधुकर चेलपेलवार, डॉ. देवकर, गजानन अक्केवार, विकास मंदावार, बापुराव जिनावार, रामलू संदरलावार, आडकू कामतवार यांनी केले.