मुकुटबन येथे भाजप कार्यकर्ता मेळावा संपन्न

तालुक्यातील पदाधिका-यांसह हजारो कार्यकर्ते सहभागी

0

सुशील ओझा, झरी: लोकसभा व विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली असून याच अनुषंगाने प्रत्येक पक्षात मोर्चे बांधणी जिल्हा, तालुका व सोशल मीडियावर नियुक्त्या करणे सुरू झाले आहे. मुकुटबन येथे ३० सप्टेंबर ला बालाजी खाजगी मार्केटच्या हॉल मध्ये भाजपाचा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. मेळाव्याला तालुक्यतील पदाधिकारी सह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकी बाबत चर्चा झाली.

तालुक्यातील प्रत्येक गावात भाजपाचे समर्थक मतदार कोणत्या प्रकारे जोडता येईल याकडे भर देणे, भाजप सरकारने जनहितार्थ शेतकऱ्यांच्या हितार्थ तसेच देशापासून तर खेड्यापर्यंत केलेले विकास कामाबाबत जनतेपर्यंत पोहचवा. अशी माहिती पदाधिकारी पासून कार्यकर्यांना सांगण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

विरोधक सरकारवर खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करीत आहे परंतु सुज्ञ जनता व्यापारी, कर्मचारी आम जनता आजही भाजपच्या विकास कामावर खुश असून विरोधकांच्या खोट्या आरोपाला बळी पडणार नसून जनता भाजप सोबतच राहणार असल्याचे उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून केला आहे.

त्यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, दिनकर पावडे, संजय पिंपळशेंडे, मुन्ना बोलेनवार गजानन मांडवकर व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.