हिवरा-बारसा ग्रामपंचयतला विशेष ग्राम स्वच्छतेचा पुरस्कार
जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी बोलेनवार यांच्या प्रयत्नाला यश
सुशील ओझा, झरी: ग्रामपंचायत पातळीवर विविध विकासकामे करून गाव स्वच्छ करण्याचे आवाहन शासकीय पातळीवरून केल्या जात आहे.याच अनुषंगाने तालुक्यातील हिवरा बरसा गट ग्रामपंचायत उतरली असून गावातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिल्या जात आहे. हिवरा बरसा गट ग्रामपंचायत ९ सदस्यीय असून सरपंच विलास आत्राम, सचिव देविदास अडपावार व ग्रामपंचायत सदस्य यांच्या मेहनतीला यश आल्याचे दिसत आहे. ग्रामपंचायत मध्ये ४ गावे मिळून ५ गावे आहेत त्यात पालगाव, बोटोनी, पार्डी, व कटली बोरगाव असून ग्रामपंचायतने शुद्ध पाण्याची आरो मशीन लावून हजारो लोकांना कमी पैशात शुद्ध पाणीपुरवठा केल्या जात आहे.
परिसरातील पाचही गावातील शाळेतील विद्यार्थांना स्वतःची साडे तीन लाखाची गाडी आणून मोफत पाणी वाटप सुरू आहे.तसेच शेजारच्या गावातील लग्न समारंभ व ईतर कार्यक्रमा करीता कमी पैशात शुद्ध आरोचा पाणीपुरवठा केल्या जात आहे ज्यामुळे गावकरी सह परिसरात हिवरा बारसा ग्रामपंचायत चे कौतुक केल्या जात आहे.
हिवरा बरसा गाव जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षी बोलेनवार यांचे असून या ग्रामपंचायत कडे त्यांचे विशेष लक्ष आहे.गावातील स्वच्छतेवर विशेष लक्ष दिल्याने यवतमाळ येथे झरी तालुक्यातून प्रथम विशेष ग्राम स्वच्छता पुरस्कार पालकमंत्री यांच्या हस्ते १ लाख रुपये रोख व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला तर दुसरे पुरस्कार मांगली व तिसरे पुरस्कार दिग्रस या गावना मिळाले .त्यावेळे जिल्हा परीषद अध्यक्ष माधुरी आडे, उपाध्यक्ष श्याम जैस्वाल, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर मान्यवरांची उपस्थिती होती. वरील पुरस्कार मिळाल्याचे श्रेय जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षी बोलेनवार व सुरेश बोलेनवार यांना जात असून ग्रामपंचायत करीता यांनी विशेष लक्ष दिले आहे.