राजुर कॉलरी येथे भगतसिंग जयंती उत्साहात साजरी

0

महेश लिपटे, राजुर कॉलरीः शहीदे-ए-आजम भगतसिंग यांच्या जयंतीदिनी वणी तालुक्यातील राजूर कॉलरी येथे राजूर विकास संघर्ष समितीने अभिवादन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी येथील किराणा व्यवसायी सरवर अली हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माकपचे कॉ. कुमार मोहरमपुरी, राहुल कुंभारे, नंदकिशोर लोहकरे सुशील अडकीने, जयंत कोयरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राजुरचे पोलीस पाटील मा. सरोज मून, प्रदीप बांदूरकर, संजय काटकर, विजय तोताडे, प्रा बंडू कांबळे उपस्थित होते

यावेळी वक्ते म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळून ७1 वर्षे उलटून जाऊन व देशाला जगातील सर्वात चांगले संविधान लाभून ही देशातील जनता मात्र आजही मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाही. उलट असलेल्या सुविधासुद्धा हळूहळू संपुष्टात आणण्याचे कार्य या देशातील सत्ताधाऱ्यांनी निवडणूकीसाठी निधी उपलब्ध करून देणाऱ्या भांडलंदारांखातीर हेतुपुरस्सर केले. जी धोरणे सत्ताधाऱ्यांनी घेतली ती संपूर्णतः भांडवलदारांना फायदा पोहचवणारी ठरली असून त्यांच्या संपत्तीत वाढ करणारी ठरली आहे. नुकत्याच आलेल्या सर्वे मध्ये भारतातील मानव विकास सूचकांकात पिछाडला असून भांडवलदारांकडे मात्र ८४ः देशातील संपत्ती एकवटली आहे. वयाच्या २३ व्या वर्षी शोषणमुक्त समाजव्यवस्थेचे स्वप्न पाहत शहीद भगतसिंग हसत हसत फासावर गेले. मी शहीद झालो तरी चालेल, परंतु माझ्यानंतर माझ्या ह्या बलिदानाने ह्या देशातील तरुण देशात होणाऱ्या शोषणाविरुद्ध पेटून उठतील व शोषणमुक्त समाजव्यवस्था निर्माण करतील. असे भगतसिंगांना वाटले होते. तेव्हा त्यांची जयंती साजरी करीत असताना त्यांचा विचार जोपासून त्यांनी सांगितलेल्या कृती केल्याशिवाय शोषण व विषमता संपणार नाही, असा सूर या वेळेस झालेल्या जयंती कार्यक्रमात सर्वच वक्त्यांनी काढला.

कार्यक्रमाचे संचालन महेश लिपटे यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता अक्षय गावंडे, प्रवीण पाटील, राजराम प्रजापती, साबीर अली, सुरज कश्यप, अमर्त्य मोहरमपुरी, शुभम साहू, मारोती उईके, प्राजक कुळमेथे, आनंद कोमलवार आणि भगतसिंग युवा क्लब चे तरुण इत्यादींनी अथक प्रयत्न केले.

Leave A Reply

Your email address will not be published.