सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण येथे अवैधरित्या रेती व गिट्टी साठा असल्याची गुप्त माहिती महसूल विभागाला मिळल्यावरून मंडळ अधिकारी देशपांडे यांनी यावर कार्वाही केली. १२ ऑक्टोबर ला दुपारी २.३० वाजता त्यांनी ही कार्यवाही केली. सैयद अमिनोद्दीन बाबा दरगाह शरीफच्या पाठीमागच्या बाजूकडील पोलीस स्टेशनच्या विहिरीकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर अवैधरित्या रेती व गिट्टी साठा होता. त्याची पाहणी करून पंचनामा केला.
सदर रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी रेतीचा साठा १० ब्रास अविद्या उत्खनन व वाहतूक करून आणल्याचे आढळले तसेच १० ब्रास गीटा रोडच्या कामाकरिता अवैधपणे टाकल्याचे दिसले. याबत मंडळ अधिकारी यांनी विचारणा केली असता सदर गिटा हे प्रवीण नोमुलवार यांच्या ट्रॅक्टर ने आणून टाकल्याची माहिती मिळाली. तसेच दर्ग्याजवळ प्रवीण नोमुलवार यांनी सार्वजनिक जागेतून १५ ब्रास रेती वाहतूक व साठवणूक केल्याची माहिती वरून रेती जप्त करण्यात आली.
पंचनामा करतेवेळी स्वत प्रवीण नोमुलवर हे आले व माझीच रेती असून मीच साठवणूक करून ठेवल्याचे सांगून निघून गेले तसेच त्यांच्याकडे वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे.