जेसीआय दांडियामध्ये आज विविध सेलिब्रिटींची रेलचेल

'या' चार सेलिब्रिटी वाढवणार कार्यक्रमाची शान

0

विवेक तोटेवार, वणी: नवरात्री उत्सवादरम्यान नगरवाला जिनिंग येथे सुरू असलेल्या जेसिआय दांडियामध्ये शनिवारी 13 अक्टोबर रोजी विविध सेलिब्रिटी येणार असल्याने वाणीकरांमध्ये आनंद व कुतूहलाचा वातावरण निर्माण झालं आहे.

वणीत दरवर्षी जेसीआय द्वारे नवरात्रीमध्ये दांडिया उत्सव सहारा करण्यात येतो. वणीकरांचा दांडिया उत्सवात अधिक सहभाग वाढला असल्याने त्यांना नवीन भेट देण्याचा जे सी आय चा प्रयत्न आहे. या दांडिया उत्सवात शनिवारी 13 ऑक्टोबर रोजी चार नवीन सेलिब्रिटींचे दर्शन वणीकरांना घडणार आहे.

सानिया खान या मिस इंडिया मधील रनर अप आहेत. तर अश्विनी तोमर या मिसेस इंडिया इलाईट आहेत. निखिल अश्वानी युवा एन एक्स ती व फॅशन मेंटर आहेत. नूतन कोलावार ज्या इंडियन इंटरनॅशनल मधील बेस्ट कॅटवाकर आहेत. या सर्व सेलिब्रिटी सोबत दांडिया खेळण्याचा अनुभव आज वणीकरना येणार आहे. सोबत या सर्व सेलिब्रिटी वाणीकरांसोबत संवादही सोडणार आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या सेलिब्रिटींच्या आगमनाने वणीकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण आले आहे. तरीही वणीकरांनी या सेलिब्रिटी सोबत दांडिया खेळण्याचा अनुभव घ्यावा व अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केलेे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.