ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील समस्त दिव्यागांना विविध योजनेचा लाभ द्या असे निवेदन प्रहार संघटनेच्या वतीने तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. मारेगाव तालुक्यात अनेक दिव्यांग आहेत. परंतु त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे प्रहारने हे पाऊल उचलले आहे.
दिव्यांगाना अन्नपुर्णा योजनेमध्ये डावलण्यात आल्याचे दिव्यांग बांधवाचा म्हणण असुन तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधवांकडे शौचालय नाही. गेल्या आठवड्यात प्रहारचे आमदार बच्चु कडु यांनी दिव्यांगांच्या समस्या मारेगाव येथे जाणून घेतल्या होत्या. त्या समस्येबाबत गटविकास अधिकारी मारेगाव यांना दुरध्वनीवरुन समस्या सोडवा असे सांगितले होते.
त्या संस्थाचा निपटारा व्हावा म्हणून तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी प्रहारचे जिल्हासंपर्क प्रमुख मृत्युंजय मोरे यांच्या नेतृत्वात मारेगावचे तहसीलदार विजय साळवे व मारेगाव पं.स.चे गटविकास अधिकारी तलवारे यांचे नावे निवेदन सादर करुन दिव्यांगाना योजनेचा लाभ देण्याची मागणी केली आहे. निवेदन देते वेळी वेळी तालुक्यातील शेकडो दिव्यांग बांधव आणि प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते.