लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

जंगलात नेऊन मुलीवर अत्याचार

0

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जुणोनी येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावतीलच मुलाने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.

माहिती नुसार १८ ऑक्टोबर रोज दुपारी २.११ वाजता मुलगी शचास गेली असता गावतीलच गजानन मडावी नामक मुलगा मुलीच्या मागे गेला व तुझ्याशी बोलायचे असे सांगून मी तुझ्यावर प्रेम करतो तुझ्याशी लग्न करतो असे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला.

याबाबत घरच्या लोकांना सांगशील तर तुला जिवाने ठार मारतो अशी धमकी देऊन मुलीला पायदळ घोंसा ते दहेगाव जंगली मार्गाने घेऊन गेला. तिला दहेगाव जवळ जंगलातच सोडून दिले. तो तिथून पसार झाला.

मुलगी दोन दिवसानंतर घरी आली व कुटुंबियांना घडलेली आपबीती सांगितली व आपल्या वडील व आत्याला घेऊन पोलीस स्टेशनला येऊन बयान दिले. यावरून पोलिसांनी आरोपी गजानन मडावी विरुद्ध बलत्कार सह बाल लैंगिक अत्याचार व इतर गुन्हे दाखल करून आरोपीला त्वरित अटक केली आहे.

विशेष म्हणजे मुलगी १८ ऑक्टोबर ला घरी न आल्यामुळे वडिलांनी मुलीची मिसिंग तक्रार दिली होती. त्यावरूनही कलम ३६३ अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. मुलगी परत येऊन बयाण देताच इतर कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार धंनजय जगदाळे, प्रवीण ताडकोकुलवार व सुलभ उईके करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.