साक्षी ठेंगणे ठरली बंपर प्राईजची विजेती
श्री मंगलमूर्ती गृपच्या दांडिया स्पर्धेचा थाटात समारोप
विवेक तोटेवार, वणी: मंगलमूर्ती ग्रृपतर्फे वणीत दांडिया उत्सवादरम्यान झालेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण थाटात करण्यात आले. नवरात्री दरम्यान मंगलमूर्ती गृपतर्फे जैताई मंदिर जवळील मोहता कॉम्प्लेक्सच्या मागे 9 दिवस दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. यात सुमारे 2500 लोकांनी सहभाग घेतला होता. सहभागी लोकांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. तसेच त्यासाठी बक्षिसांची बंपर लूटही होती.
मंगलमूर्ती ग्रुप 2011 पासून दांडिया उत्सवाचे आयोजन करीत आहे. परंतु यावर्षी प्रथमच मेगा बंपर प्राईज ठेवण्यात आले होते. यात हिरो ड्युएट मोपेड हे बंपर प्राईज ठेवण्यात आलं होतं. हे बक्षीस मारोती टाउनशिप तथा साईलीला टाउनशिपचे सर्वेसर्वा संजय निमकर यांच्यातर्फे ठेवण्यात आले.
यात प्रथम मेगा बंपर हिरो ड्युएट या गाडीची विजेती ठरली कु. साक्षी ठेंगणे तर दुस-या बक्षिसाचे मानकरी नेहा देवडे ठरली. त्यांना फ्रीज देण्यात आला. तिसरे बक्षीस कॉम्प्युटर याची विजेती भाग्यश्री देवाळकर, तर चौथे सायकल हे बक्षीस जान्हवी त्रिवेदी यांना मिळाले. तर इतर सतरा स्पर्धकांनाही विविध बक्षिसांचे वाटप करण्यात आले.
मंगलमूर्ती ग्रृपतर्फे आयोजित दांडियात यावर्षी विविध सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यात सुप्रसिद्ध गायक, मॉडेल, ऍक्टर, ऍक्ट्रेस यांचा समावेश होता. तसेच दोन दिवस लाईव्ह बँडचे आयोजनही करण्यात आले होते. यात सुप्रसिद्ध बँडच्या ठेक्यावर वणीकरांनी दांडियाचा वणीकरांनी आस्वाद घेतला. तर कार्यक्रमाला केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनीही भेट दिली होती. या दांडिया उत्सवात सहभागी झालेल्या स्पर्धकांना सचिन आत्राम यांनी प्रक्षिक्षण दिले.
‘वणी बहुगुणी’शी बोलताना सोमू निमकर म्हणाले की…
दरवर्षी काहीतरी नवीन करण्याचा आमचा प्रयत्न असतो. यावर्षी आम्ही पहिल्यांदाच मेगा बंपर प्राईज ठेवले होते. वणीकरांनी या कार्यक्रमाला जंगी प्रतिसाद दिल्याने मी त्यांचे आभार मानतो. तसेच लवकरच या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर आम्ही गरजुंना कपडे वाटप, तसेच रक्तदान शिबिर इत्यादी सामाजिक उपक्रम हाती घेणार आहोत.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगलमूर्ती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सोमु निमकर, दांडिया उत्सव समितीचे अध्यक्ष विहंग उपरे, निकेश माकडे, पंकज गुप्ता, रोहित लांजेवार, जितू पाटील, विलास निमकर, अजय पोहाणे, पियुष मेहता, अजय कोडगिरवार, धवल कटारिया, प्रवीण फेरवानी, आकाश अमरवानी, अक्षय एकरे, आशिष गुप्ता, मयूर गोयनका, मयूर गेडाम, निकेत गुप्ता, विनोद खुराणा, अंकुश जैस्वाल, धनुजी अग्रवाल, अनुप राठी, विजय अग्रवाल, शैलेश धोके, संजय छाजेड, आकाश सागरे, दिलीप शेंडे तसेच मंगलमूर्ती ग्रुप चे सर्व सभासदांनी परिश्रम घेतले.