बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील सार्वजनिक महिला मंडळातर्फे दरवर्षी माँ शारदा उत्सव पाच दिवस विठ्ठल रुक्मिणी समाज मंदिराच्या सभागृहात झाला. या पाच दिवसाची सुरुवात 21 ऑक्टोबरला माँ शारदा देवीची स्थापना करून झाली. यानंतर विविध स्पर्धा झाल्यात. यामध्ये पाना – फुलापासून गणपती तयार करणे, गौळण स्पर्धा, एक मिनिट अंदाज बांधणे, हौजी गेम, लकी लेडी, 22 ऑक्टोबरला देवी स्तवन, आर्टिफिशल तोरण तयार करणे, नाटिका व माजी अध्यक्षाचा सत्कार झाला.
23 ऑक्टोबरला 30 मिनिटांमध्ये धान्याची रांगोळी व गरबा 24 ऑक्टोबरला बिस्किटची कलाकृती तयार करणे, डान्स व काला आणि 25 ऑक्टोबरला श्री गजानन महाराजाच्या पोथीचे पारायण झाले. पाच दिवशीय कार्यक्रमामध्ये महिला, लहान मुले व मुली मिळून 200 जणांनी स्पर्धेत सहभाग घेतला. शारदा देवीची आरती करून कार्यक्रमाची सांगता झाली. महिलांसाठी महाप्रसाद देण्यात आला. या कार्यक्रमाला कविता सुरावार, स्मिता गुंडावार, कविता जन्नावार, चित्रा उत्तरवार व वीणा खोब्रागडे यांनी परिश्रम घेतले.