विवेक तोटेवार, वणी: वणीतील बाजोरिया लॉन इथे शुक्रवारी गरबा क्वीन ही स्पर्धा रंगली. यात रोशनी देवाळकर व कु. आस्था दहेकर या गरबा क्वीन ठरल्या. अत्यंत चुरशीच्या झालेही स्पर्धा बघण्यासाठी वणीकरांनी एकच गर्दी केली होती.
वणीत नवरात्री दरम्यान विविध मंडळांद्वारे गरब्याचे आयोजन केले जाते. यात ठरलेल्या विजेत्यासाठी आणखी एक स्पर्धा असते. ही स्पर्धा गरबा क्वीन या नावाने घेतली जाते. ही स्पर्धा दोन गटात होती. अ गट हा वीस वर्षांवरील महिला तर ब गट हा वीस वर्षांखालील मुलींचा. यात नृत्य, वेशभुषा, अभिनय इत्यादी बाबी विचारात घेऊन गरबा क्वीन ठरवली जाते.
अ गटात प्रथम बक्षीस हे रोशनी देवाळकर यांना मिळाले. 11 हजार रोख, सन्नानचिन्ह आणि प्रमाणपत्र अशा या पुस्काराचं स्वरूप होतं. तर द्वितीय पुरस्कार माधवी माळीकर यांना 7 हजार रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले. तर ब गटात प्रथम पारितोषीक हे आस्था दहेकर यांना मिळाले तर द्वितीय पुरस्कार साक्षी ठेंगणे हिला मिळाले. यांना अनुक्रमे 11 हजार, 7 हजार रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आलं.
श्रद्धा वर्मा, सृष्टी मालेकर, गीता म़डावी व विभूती सवाई यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमाला वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, राजाभाऊ पाथ्रटकर, राकेश खुराणा, संजय निमकर, सैयद मतिन मनमोहन अग्रवाल, गणपत लेडांगे, राहुल ठाकूर, राजू महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन ऍड नीलेश चौधरी व सुधीर साळी यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लबचे अंकुश जैस्वाल, विनोद खुराणा, निकेत गुप्ता, निखिल केडिया, मयूर गोयंका यांच्या सह रोटरीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
लिंकवर क्लिक करून पाहा स्पर्धेचा व्हिडीओ…