झरी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीकरिता काँग्रेस उतरली रस्त्यावर
सुशील ओझा, झरी: यवतमाळ जिल्ह्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुख्य पीक कापूस, तूर, सोयाबीन या पिकांना परतीचा पाऊस न आल्याने मोठे नुकसान झाले. कापूस सोयाबीन ही मुख्य पिके असून पावसाने ऐन वेळीे हुलकावणी दिल्याने कापूस,तूर च्या पिकांची वाढ खुंटली तर कापसीच्या झाडाला ७ ते ८ बोन्डांच्या वर लागले नसल्याने एकरी ५ ते ६ क्विंटलच्या वर कापूस निघणे सुद्धा कठीण झाले आहे.
ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे .तसेच अत्यल्प उत्पन्न झाल्याने तालुक्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या हितार्थ तहसील कार्यालयावर धडक मोर्चा नेऊन तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करा व नाफेड व सी सी आय मार्फत कापूस व सोयाबीन ची खरेदी शासनाने करून हमीभावाच्या दीडपट स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी नुसार सोयाबीन ,कापूस, चणा, तूर, व इतर कृषीमालांचा भाव देण्यात यावा.
शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला दिवसा वीजपुरवठा देण्यात यावा तसेच बोंडअळी उर्वरित रक्कम शेतकर्यांच्या खात्यात त्वरित जमा करण्यात यावी व शेतकर्याना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी. अशी मागणी घेऊन काँगेसचे माजी आमदार वामनराव कासावर यांच्या नेतृत्वात सेवादलअध्यक्ष राजीव कासावार, तालुका अध्यक्ष भूमारेड्डी बाजनलावर, शुभांगी बेलखेडे, जिल्हा उपाध्यक्ष, राजीव येल्टीवार, कृ उ बा समिती सभापती संदीप बुरेवार, सुनील ढाले, बळी पेंदोर, विनोद गोडे, प्रकाश म्याकलवार, नागोराव उरवते, नीलेश येल्टीवार, मिथुन सोयाम, संतोष कोहळे, भगवान चुकलवार, हरिदास गुर्जलवार, राहुल दांडेकर, राहुल गलेवार, मनोज अडपावार, जाणक नाखले, शेखर बोनगीरवार, कालिदास अरके, वामन भोंग, संजय भोयर, इरफान शेख ताणबा शेंडे, कैलास धोटेसह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी यांच्या उपस्थित काढण्यात आले.