वणीत पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची सहविचार सभा
सुरेन्द्र इखारे, वणी: येथील श्रीमती नुसाबाई चोपणे विद्यालयात पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची सह विचार सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी नीरज डफळे होते. या वेळी विजय विसपुते, विनोद संगीतराव, विनोद ताजने, सुनील चोपणे, देवळकर, भारत गारघाटे उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रात शिक्षकांच्या अनेक समस्या असल्याने त्या सोडविण्याच्या दृष्टीने व मूळ संघटना दावणीला बांधलेली असल्याने त्या संघटनेला जागा दाखविण्याचे दृष्टीने आज पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली.
तेव्हा शिक्षकांनी आत्मपरीक्षण करून संघटनेशिवाय पर्याय नाहीअसे विचार व्यक्त करण्यात आले यावेळी वणी तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली यामध्ये तालुका अध्यक्ष रवींद्र उलमाले, कार्याध्यक्ष भीमराव तेलंग, रवींद्र खिरतकार, प्रकाश देवळकर, महेंद्र मिळमिळे, आत्राम, चिलखवर, ननावरे, अमोल ठावरी, नीलेश चावले, लखामपुरे, कुमरे, खुजे तसेच महिला आघाडी गोहकार, शुभांगी चोपणे तसेच मारेगाव तालुका कार्यकारणी गठीत यामध्ये तालुका अध्यक्ष रमेश धुमने, कार्यध्यक्ष सुरेश न्हवते, उपाध्यक्ष सीताराम खाडे, सचिव प्रवीण नगराळे, अरुण भरणे, नितीन गौरकार, तेलंग, धोके, आत्राम यांची निवड एकमताने करण्यात आली.
सहविचारसभेचे सूत्रसंचालन चौधरी यांनी केले. आभार अभय पारखी यांनी मानले. सभेचे यशस्वीतेसाठी अविनाश ठाकरे, छाया बुटले, एकरे, रवी धुमने यांनी सहकार्य केले.