प्रवीण खानझोडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

जाती धर्मापलीकडे जाऊन माणसातील माणूस शोधणा-या कार्यकर्त्याचा आज वाढदिवस

0

निकेश जिलठे, वणी: जाती, धर्म बाजुला सारून केवळ माणसात माणूस बघून कार्य करणारे व्यक्ती बोटावर मोजण्याइतके आहेत. आजच्या राजकारणात आणि समाजकारणात धर्मांध आणि जातंध्यांची चलती आहे. मात्र फुले शाहु आंबेडकरी विचारांची कास धरून आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारी व्यक्ती म्हणजे प्रवीण खानझोडे. तसं त्यांचं प्रोफेशनल वर्क रिलायन्स निप्पोन लाईफ BDM मध्ये आहे. पण त्यांची विशेष ओळख म्हणजे राजकारणापलीकडे पाहणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनच आहे. हा सर्व डोलारा सुरळीत सुरू असताना त्यांनी एक व्यावसायिक म्हणूनही आपली ओखळ निर्माण केली आहे. 

प्रवीण खानझोडे यांचा अल्प परिचय…
प्रवीण यांचा जन्म 17 नोव्हेंबर 1978 चा. सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचं मुळ गाव मारेगाव रोडवरील गौराळा. वडील wcl मध्ये नोकरीला. वडीलांची राजूर येथे नोकरी असल्याने 1979 मध्ये ते संपूर्ण परिवारासह राजूर येथे स्थलांतर झाले. प्रवीण यांचं सहावी पर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. तर दहावी पर्यंतचं शिक्षण राष्ट्रीय विद्यालय राजूर इथे झालं.

प्रवीण सहावीत असताना एक मोठी घटना त्यांच्या आयुष्यात घडली. त्यांच्या वडीलांनी अचानक नोकरी सोडली. त्यामुळे घरीचं आर्थिक गणित बिघडलं. त्यामुळे कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी यासाठी त्यांनीही हातभार लावायचं ठरवलं. 14 व्या वर्षां पासून मिळेल ते काम करायचं त्यांनी ठरवलं. मात्र हे सर्व करताना शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ नये याची पूर्ण काळजी त्यांनी घेतली. त्यातच त्यांचा संपर्क आंबेडकरी चळवळीतील काही मित्रांशी आला. या मित्रांच्या विशेष सहकार्यानेच त्यांना वेळोवेळी शिक्षणात मदत झाली. त्यावेळी जे ते आंबेडकरी चळवळीशी जुळले तेव्हापासून आजपर्यंत ते या चळवळीशी जुळलेले आहेत.

शाळेत असताना ते राजूर येथील किराणा दुकानात सकाळी व सायंकाळी काम करायचं व दिवसा अभ्यास कारायचा अशी त्यांची दिनचर्या होती. दहावी नंतर त्यांनी वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुढे बीए पर्यंत त्यांनी तिथंच शिक्षण घेतलं. कॉलेजला असतानाच आंबेडकरी विचारधारेने प्रभावित होऊन त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 

थोडक्यात कार्य…
बहुजन स्टुडंन्ट्स फेडरेशनच्या माध्यमातून आपल्या परिसरात जनजागृती करून 2012च्या पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत जिल्ह्यात बहुजन समाज पार्टीचे उमेदवार निवडून आणून सामाजिक परिवर्तन घडवून आणले. त्यावेळी अनेक विकासात्मक काम करण्यात आले.

आजच्या ओबीसी समाजात जनजागृती करण्याची नितांत गरज आहे. ओबीसींना असलेले हक्काची जाणीव आजही या समाजाला नाही त्यामुळे त्यांच्यात जनजागृती करण्यासाठी त्यांनी ओबीसी परिषदेचे गठन केले. ओबीसी परिषदेच्या माध्यमातून ते जनजागृतीचे कार्य करतात. तसेच ते बारा बलुतेदार संघाचे वणी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष आहेत. 

त्यांचा व्यवसाय हा इंशोरंस सेक्टर मधला आहे. गेल्या 10 वर्षांपासून ते रिलायन्स निप्पोन लाईफ BDM मध्ये काम करतात. मात्र व्यवसाय करतानाही त्यांचे सामाजिक कार्य सुरूच आहे. या माध्यमातून त्यांनी वणी परिसरातील अनेक होतकरू लोकांना आर्थिक मदत केली आहे.

जाती धर्मापलीकडे जाऊन माणसातील माणूस शोधणा-या कार्यकर्त्याचा आज वाढदिवस... प्रवीण खानझोडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

शुभेच्छुक: बारा बलुतेदार चळवळीतील कार्यकर्ते वणी मारेगाव झरी, तसेच मित्र परिवार

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.