सुकणेगाव येथे भवानी मातेच्या मंदिराच्या पाय-यांचे लोकार्पण

डॉ. लोढा यांच्या पुढाकारातून व लोकवर्गणी, श्रमदानातून पाय-या तयार

0

निकेश जिलठे, वणी: सुकणेगाव येथे भवानी मातेच्या मंदिराच्या पाय-याचा लोकार्पण सोहळा शनिवारी दिनांक 17 नोव्हेंबरला पार पडला. या पाय-या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस यांच्या पुढाकाराने व लोकवर्गणी आणि श्रमदानातून करण्यात आल्या. मंदिराला पाय-या झाल्याने भाविकांना आता मंदिरात जाणे सोयिस्कर झाले आहे.

सुकणेगाव या गावात भवानी मातेचे प्रसिद्ध असे मंदिर आहे. फक्त नवरात्रच नाही तर इतर दिवशीही अनेक भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. मात्र मंदिराला पाय-या नसल्याने अनेक वृद्ध, महिला, मुलं यांनी मंदिरात जाण्यासाठी त्रास व्हायचा ही बाब लक्षात घेऊन सुकणेगावातील काही लोकांनी या मंदिराच्या पाय-यांसाठी डॉ. लोढा यांची भेट घेतली होती. त्यानुसार आठ दिवसांआधी पाय-याच्या कामाला सुरूवात झाली. याआधी डॉ. लोढा यांच्या पुढाकारातून गावात पांदण रस्त्याचे कामही झाले आहे.

पायऱ्यांच्या कामासाठी डॉ. लोढा यांनी पुढाकार घेतला गावक-यांनी त्यांना यावेळीही चांगली साथ दिली. गावक-यांनी लोकवर्गणी गोळा केली तसेच श्रमदानाची तयारी दाखवली. गावक-यांच्या या सहकार्यामुळेच केवळ आठवड्याभरात या पाय-यांचे काम पूर्ण झाले. अखेर शनिवारी या पाय-यांच्या लोकार्पणाचा सोहळा पार पडला. या सोहळ्याला संपूर्ण गाव गोळा झाले. डॉ. लोढा यांचे औक्षवंत करण्यात आले. वाजत गाजत फटाक्यांच्या आतषबाजीत गावक-यांनी हा सोहळा साजरा केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मारोती पाटील राजूरकर यांनी डॉ. लोढा यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषणात डॉ. लोढा म्हणाले की सुकनेगावची ओळख वणी तालुक्यातील एक श्रीमंत गाव म्हणून आहे. मात्र गावात अद्यापही अनेक सुधारणा होणे गरजेचे आहे. मात्र सुकणेगावातील नागरिक सुधारणेबाबत नेहमीच प्रयत्नशील असतात. गेल्या वेळी रस्ता तयार करण्यासाठी त्यांनी जशी साथ दिली तशीच साथ त्यांच्याकडून पाय-या तयार करण्यासाठीही मिळाली. त्याचे संपूर्ण श्रेय गावातील युवा पिढीला जाते. ज्याप्रमाणे एखाद्या रोगावर डॉ उपचार करतो तो रोग बरा झाल्यानंतर रोग्याला जितका आनंद होतो तितकाच आनंद डॉक्टरलाही होतो. त्याचप्रमाणे ही अवस्था असल्याचेही ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मारोती राजूरकर, अनिल खामनकर, सचिन राजूरकर, प्रशांत राजूरकर, चंद्रकांत पावडे तसेच गावातील नागरिकांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला राकाँचे वणी विधानसभा अध्यक्ष जयसिंगजी गोहोकर, राजाभाऊ बिलोरिया, प्रभाकर मानकर, संजय जंबे, महेश पिदूरकर, संदिप धवणे, अंकुश नेहारे, सूर्यकांत खाडे, अंकुश मापूर, स्वप्निल धुर्वे, सिराज सिद्दीकी, भारत मत्ते, मारोती मोहाडे, राऊत, नितीन गोडे, राजू उपरकर, अशोक उपरे, रवि येमुर्ले, इत्यादींसह वणी तालुक्यातील राष्ट्रवादीतील कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.