कवी-लेखकांना सुवर्णसंधी, जुळा ‘वणी बहुगुणी’शी
'कॉलेजकट्टा', 'आम्ही वणीकर' कॅटेगिरी लवकरच सेवेत, तुमच्या कलागुणांना मिळणार वेबसाईटवर वाव
वणी: ‘वणी बहुगुणी’ हे आपलं न्यूज पोर्टल असल्यानं यात वणीकर आणि वणीशी जुळलेल्या व्यक्तींचा अधिकाधिक समावेश करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी ‘वणी बहुगुणी’ या वेबसाईटवर दोन नवीन वेब कॅटेगिरी सुरू करत आहे.
काय आहे ‘आम्ही वणीकर’ कॅटेगिरी?
वणी आणि परिसरातील तसंच वणीशी जुळलेल्या व्यक्तींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही कॅटेगिरी असणार आहे. या कॅटेगिरीमध्ये फक्त आपण लिहिलेले कविता, लेख.. तुम्ही बनवलेल्या शॉर्टफिल्म, तुम्ही गायलेलं गाणं. सोलो ऍक्टिंग, स्टँडअप कॉमेडी, रांगोळी, पेंटिंग्ज, हस्तकला. इत्यादींचा समावेश असणार आहे. तुम्ही लिहिलेल्या कविता, लेख तसंच तुमच्या जवळ असलेल्या कलेबद्दल माहिती देण्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता. तुमच्यात असलेल्या कला गुणांना ‘वणी बहुगुणी.कॉम’ या वेबसाईटवर स्थान दिलं जाईल.
काय आहे ‘कॉलेजकट्टा’ ?
कॉलेजकट्टा हा तरुणाईचा लाडका. कॉलेजमध्ये अनेक कार्यक्रम होतात. अनेक किस्से घडतात. कॉलेजमधल्या या घडामोडी टिपण्यासाठी आम्ही ‘कॉलेजकट्टा’ ही कॅटेगिरी सुरू करत आहोत. यासाठी आम्ही वणी आणि परिसरातील प्रत्येक कॉलेजमध्ये चार कॉलेज प्रतिनिधींची निवडणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना लिखानाची आवड आहे. असे विद्यार्थी आम्हाला संपर्क साधू शकता. निवड झालेल्या कॉलेज प्रतिनिधींना एक दिवसाचं लिखान आणि कवरिंगचं प्रशिक्षण दिलं जाईल. हे प्रतिनिधी कॉलेजकट्ट्यावरच्या सर्व घडामोडी कव्हर करणार आहेत.
आर्टिकल, कविता पाठवण्यासाठी, तुमच्यात असणा-या कलागुणांविषयी माहिती देण्यासाठी, तसंच कॉलेज प्रतिनिधी होण्यासाठी संपर्क :
निकेश: 9096133400
Email id: [email protected]