जोडप्यानं केलं चक्क अंटार्क्टिकावर लग्न, केला वर्ल्ड रेकॉर्ड

रक्त गोठवणाऱ्या बर्फाळ अंटार्क्टिकावर साध्या कपड्यात लग्न

0

अंटार्क्टिका: आगळ्यावेगळ्या पद्धतीनं लग्न करण्याची अनेकांची इच्छा असते. अनेक जण त्यासाठी ऍडवेंचर करण्याचा प्रयत्न करतात. कोणी आकाशात उडणाऱ्या विमानात लग्न करतात, तर कोणी भरसमुद्रात पोहत आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेतात. पण ब्रिटनचे टॉम सिल्वेस्टर आणि ज्यूली बॉम यांनी चक्क रक्त गोठवणाऱ्या बर्फाळ अंटार्क्टिकावर साध्या कपड्यात लग्न करून विश्वविक्रम केला आहे.

टॉम आणि ज्यूली ब्रिटनच्या अंटार्क्टिका सर्वे या संस्थेसाठी काम करतात. त्याचबरोबर गाईड म्हणूनही ते काम करतात. आपले लग्न अविस्मरणीय व्हावे अशी या जोडप्याची ईच्छा होते. त्यातही जगभरात अंटार्क्टिकाएवढे सौंर्दय व इथल्या माणसांसारखी प्रेमळ माणसं कुठल्याही देशात नाहीत. यामुळे बर्फाच्छादित अंटार्क्टिकावरच लग्न करण्याचा आम्ही निर्णय घेतल्याचं या दोघांनी सांगितलं आहे.

(हे पण वााचा: 15 वर्षांच्या मुलाचं 73 वर्षांच्या आजीबाईशी लग्न, अजब प्रेमाची गजब कहाणी)

Ankush mobile

या लग्न सोहळ्यात ज्यूलीने नारंगी रंगाच्या जाड कपड्यापासून बनलेला पायघोळ स्कर्ट व बिनबाह्यांचे ट्यूनिक घातले होते. तर टॉमने साधा सूट घातला. अंटार्क्टिकावर असे कपडे घालणे आरोग्यास धोकादायक आहे हे माहित असूनही या जोडप्याने हटके लूक दिल्याने सगळीकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दोन दिवस चाललेल्या या लग्नसोहळ्यात पाहुणे म्हणून टॉम, ज्यूलीचे सहकारी उपस्थित होते.

One Day Ad

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!