नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील डोर्ली येथील एका शेतकऱ्याने कर्जामुळे नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी उघडकीस आली. मैफत मोहुर्ले वय 52 रा. डोर्ली असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव आहे.
मारेगाव तालुक्यातील डोर्ली येथील मैफत बापुराव मोहुर्ले वय 52 या शेतकर्याने कर्जाला कंटाळून ता. १ डिसेंबरला दुपार दरम्यान नजिकच्या निर्गुडा नदीत उडी घेवुन आपली जिवन यात्रा संपविली. त्यांचेवर मध्यवर्ती बँकेचे कर्ज होते. त्याची परतफेड होवु शकत नसल्याने त्याने हा निर्णय घेतल्याची शंका जवळच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
मैफत दुपारी फिरायला जातो म्हणुन घरुन निघुन गेले होते. रात्री उशिरा पर्यत ते घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुबीयांनी शोधा शोध केली असता शनिवारी संध्याकाळी मैफतचा म्रुतदेह निर्गुडा नदीत तरंगत दिसुन आले. मृतदेह उत्तरणीय तपासणी मारेगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्या कड़े तीन एकर शेतजमींन असून त्याचे पश्चात मुलगा संतोष व तीन मुली आहेत. त्यांच्या तीनही मुलीचे लग्न झाले आहे. लग्नाच्या कर्जाचा डोंगर कमी होत नसताना यंदा दुष्काळी परीस्थितीने आणखीच परिस्थिती गंभीर झाल्यानेच हा निर्णय घेतला असल्यची चर्चा व्यक्त होत आहे