भरधाव कारच्या धडकेत रोही जागीच ठार

भाजप पदाधिकाऱ्याच्या कारनं घडला अपघात

0
वणी: वणी येथील केंद्रीय मंत्र्यांच्या अगदी निकट समजल्या जाणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याच्या सुसाट वेगानं जाणाऱ्या कारनं रोहीला धडक दिली. यात रोही जागीच ठार झाला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वणी येथील केंद्रीय मंत्र्यांच्या अगदी निकट असलेले भाजपाचे स्थानिक नेते दिनकर पावडे यांचे सुपुत्र अनुप पावडे हे दुपारी चार वाजताच्या सुमारास कामानिमित्त चंद्रपूर कडे जात होते. त्यांच्या कार क्रमांक एम एच 29 ए आर 5950 ने जात असताना चारगाव चौकीजवळ शेतातून रोह्याचा कळप पळत आला. सुसाट वेगाने जाणाऱ्या कारवर या रोही धडकल्या. त्यात रोही जागीच ठार झाला.
या अपघातात कारमधील अनुप दिनकर पावडे याला किरकोळ मार लागला तर त्यांच्यासोबत असलेल्याय आकाश बदकी याला कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती शिरपूर पोलीस व वनविभागाला देण्यात आली आहे. आता वनविभाग व पोलीस कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.