वीर छत्रपती चिडे यांना महाराष्ट्र शासनाचे शहीद सन्मान पत्र
सुरेंद्र इखारे, वणी: दारू तस्करांच्या हल्ल्यात वीर मरण आलेले छत्रपती चिेडे यांचा शहीद म्हणून सन्मान करण्यात येणार आहे. गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शहीद सन्मान पत्र वीर पत्नीला देण्यात येणार आहे.
वणी तालुक्यातील मारेगाव (कोरम्बी) येथील पोलीस अधिकारी छत्रपती चिडे हे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे कार्यरत असताना दारू तस्करांनी 6 नोव्हेंबर 2018 ला हत्या केली. आपले सेवा कर्तव्य बजावताना चिडे यांना वीर मरण पत्करावे लागले. त्यांच्या बलिदानाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना शहीद म्हणून सन्मान केला आहे.
आज 13 डिसेंबर 2018 ला चंद्रपूर जिल्ह्यचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते शहीद वीर पत्नी माधुरी छत्रपती चिडे यांना शहीद सन्मान पत्र सुपूर्द करण्यात येणार आहे. वणी तालुक्यातील सर्व लोकांनी सायंकाळी 5 वाजता चिडे यांच्या चंद्रपूर येथील राहते घरी तुकुम येथे हजर राहावे असे आवाहन धनगर संघर्ष समिती, वणी यांनी केले आहे