मारेगाव तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करा

0

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील वनोजादेवी, हिवरा, गोरज या परिसरात होत असलेली अवैद्य दारू विक्री बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे करण्यात आली. राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अंकुश मापुर यांच्या नेतृत्वात मारेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार दिलीप वडगावकर यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले.

जिल्हा पोलिस अधिक्षकांचा अवैद्य धंदे बंद करण्याचा आदेश असताना तालुक्यातील वनोजादेवी, गोरज, हिवरा इत्यादी गावात चोरटया पद्धतीने अवैध दारू विक्री चालू आहे. या दारुच्या आहारी शेतकरी, शेतमजुरांसह अल्पवयीन विद्यार्थी सुद्धा जात आहे. त्यामुळे यांच्या भविष्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे.

अवैध दारूविक्रीबाबत मारेगाव पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने यावर आळा घालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मारेगाव शाखेच्या वतीने ग्रामीण भागात चालू असलेली अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.

यावेळी रॉ.कॉ. चे जिल्हा सरचिटणीस अंकुश माफुर, भास्कर राऊत, संजय पाटील, गौतम उमरे, बापू तामगाडगे, महेंद्र चिंचोलकर, पठान, संजय पानघाटे, पदमाकर काळे, तातेड, राऊत, शुभांगी राखुंडे, शालू आत्राम, रश्मी कोडपे आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.