आरोपी अनिल मेश्रामच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

0

विलास ताजने, वणी :  पोलिसांवर हल्ला करणारा आरोपी अनिल मेश्रामला पांढरकवडा पोलिसांनी आज दि. १६ डिसेंबरला रात्री साडेनऊच्या सुमारास पांंढरकवडा तालुक्यातील हिवरा (बारसा) येथील मंदिरात अटक केली. यावेळीही आरोपीने पोलिसांवर हल्ला चढवला होता.

अशा आवळल्या मुसक्या…

मारेगाव पोलिसाच्या खून  प्रकरणातील हिवरीचा फरार आरोपी अनिल मेश्राम वय ३४ हा 26 नोव्हेंबरपासून मारेगाव पोलीस ठाण्यातील जमादाराचा खून करून फरार होता. पोलीस तेव्हापासून आरोपीच्या शोधात होते. मात्र आरोपी काही हाती लागत नव्हता. चार दिवसांआधी आरोपी हिवरा बारसा येथून जवळच असलेल्या महादुळी या गावात जेवण करायला गेला होता.

जेवण करताना तिथे हल्ल्याबाबत विषय निघाला तेव्हा आरोपीने हत्या केल्याची कबुली देऊन चूक झाल्याचे सांगितले. हे बघून तो व्यक्ती घाबरला. त्याने याची माहिती लगेच पोलीस पाटलांना दिली. तेव्हापासून पोलीस त्या परिसरात त्याच्या मागावर होते.

दि.१६ रोज रविवारी रात्री पांढरकवडा परिसरात हिवरा बारसा येथे असल्याची गोपनीय माहिती मारेगाव पोलिसांना मिळाली. बारसा हे गाव पांढरकवडा पासून बारा किमी अंतरावर आहे. मारेगाव पोलिसांनी याची माहिती यवतमाळ एसपी यांना दिली. एसपी यांनी हिवरा हे गाव पांढरकवडा जवळ असल्याने पांढरकवडा पोलिसांना सूचना दिल्या. 

सदर माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा अमोल कोळी, पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवी वाहुळे, मंगेश भोंगाडे, शब्बीर पठाण, पोलीस हवालदार भाउ नाकतोडे, विठ्ठल बुरुजवाडे, पोलीस नाईक सुहास मंदावार, सचिन मडकाम, अंकुश बहाळे, चालक पोलीस शिपाई रिझवान शहा यांनी सापळा रचला.

यावेळी पोलिसांनी आरोपीला शरण येण्याच्या सूचना दिल्या. मात्र आरोपीने काठीने पोलीस पथकावर हल्ला केला. त्यात विठ्ठल बुरुजवाडे, अंकुश बहाळे आणि रिझवान शहा किरकोळ जखमी झाले. पोलीस बळाचा वापर करून अखेरीस आरोपीला ताब्यात घेतले. जखमी पोलीस आणि आरोपीवर उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथे उपचार करण्यात आले.

आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी मारेगाव पोलिसांच्या हवाली केले. आरोपीवर कलम ३०२, ३२४, ३३३,३५३, ३४ भादंवी अपराध क्रमांक ३९९/२०१८ नुसार गुन्हे दाखल आहे.

पोलीस पथकासोबत आरोपी अनिल मेश्राम

आरोपी अनिल मेश्रामला एका जुन्या मारहाणीच्या प्रकरणात अटक झाली होती. तो जमीनावर बाहेर होता. परंतु तो न्यायालयात तारखेवर हजर राहत नव्हता. म्हणून पोलीस त्याला अटक वारंट बजावून अटक करण्यासाठी गेले होते. पोलिसांसोबत बोलणे चालू असतानाच आरोपीने अचानक पोलिसांवर लाकडी  दांड्याने हल्ला केला. यात पोलीस हवालदार राजेंद्र कुळमेथे यांचा मृत्यू झाला. तर पोलीस हवालदार मधुकर मुके, पोलीस शिपाई प्रमोद फुफरे जखमी झाले होते.

लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ…


बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.