मारेगावजवळ भीषण अपघात, सैन्यदलातील जवानाचा मृत्यू

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव येथून दोन किमी अंतरावर इस्सार पेट्रोल पंप जवळ आज रविवारी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास टँकर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दोन जण ठार झाले.

प्राप्त माहिती नुसार वासुदेव बापूराव कोयचाडे वय ४५. व सचिन यशु कोयचाडे वय २५ हे दुचाकीने (पल्सर)  मारेगाव वरून खडकी (बुरांडा) गावाकडे जात होते. हे दोघेही काका पुतण्या आहेत. याचवेळी यवतमाळ कडून येना-या डीएनआर गृपचा टँकर (एम.एच ३४ बी.जी.३१७७) ने दुचाकीला (एम.एच २९ ,ए.यु. ७५०) समोरासमोर जबर धडक दिली. यात पुतण्या व काका यांचा जागीच मृत्यु झाला.

हा अपघात इतका भयानक होता की दुचाकी आदळल्याने दुचाकी २५ फुटा पर्यंत घासत गेली. घटनेची माहिती  मिळताच मारेगाव पोलीस घटना स्थळी पोहचले,घटना स्थळावरुन दोन्ही मृतकाचे शव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

मृतक सीआरपीएफचा जवान 

 मृतक सचिन कोयचाडे हे आसाम येथे सीआरपीएफमध्ये कार्यरत होते. ते २८ /११ /२०१८ पासून रजेवर होते. काही दिवसातच ते पुन्हा कर्तव्यावर रूजू होणार होते. आज ते त्यांच्या काकासोबत कामा निमित्ताने मारेगाव येथे आले होते. गावाकडे जात असताना हि घटना घडली. ही घटना माहित होताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.