राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे उद्घाटन
रोहण आदेवार, वणी: तालुक्यातील केसुर्ली गावात लोकमान्य टिळक महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेचे केसुर्ली या गावात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिराची सुरुवात रवीवारी झाली. शिबिराचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला यांनी केले.
या कार्यक्रमाला प्राचार्य अरुंधती निनावे, शिप्रमंचे उपाध्यक्ष रमेश अणे, लक्ष्मण भेदी, अशोक सोनटक्के, दत्रातेय सुरावार, उमाकांत कुचनकर, अनिल जयस्वाल, रमेश बोहरा, सरपंच मंगला टोंगे, मुख्याध्यापक कपिल बोर्डे मंचावर उपस्थित होते.
23 ते 30 डिसेंबर 2018 पर्यंत हे शिबिर होणार आहे. या शिबिरामध्ये ग्रामस्वच्छता, रक्तगट तपासणी, व्यक्तिमत्त्व विकास, हागणदारी मुक्त अभियान, पर्यावरण जागृती, अंधश्रद्धा निर्मूलन व जागृती, शोषखड्डे, जल व्यवस्थापन अशा प्रकारचे उपक्रम राबवले जातील.
विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा या साठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश माघाडे यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. किशन घोगरे यांनी केले