बहुगुणीकट्टा: जर भीमराव रामजी आंबेडकर जन्मा आले नसते

महापरिनिर्वाण दिनानिमित्त काव्य आदरांजली....

0

जर भीमराव रामजी
आंबेडकर जन्मा आले नसते…..
मी चालू शकलो नसतो
या जगात आपल्या मताने..
बोलू शकलो नसतो
आपल्या विचाराने…

शिकलो असतो का मनसोक्त…
आणि लिहू ही शकलो
नसतो …
माझ्या लेखनीला वळण
आले नसते ..
आमचेही अंगठे कापले असते ..
दारावर आज असतो …

वेशिवर वाट पहाट ,
गावात येण्याची …
विद्रोह काय तो समजला नसता कधी….
गुलामी आणि स्वातंत्र यातील फरक समजला असता का कधी?

भीती मिटली नसती ..
या मानुसकीच्या
ठेकेदारांची …..
आई बहिन आज पुढे गेली असती का कधी ?
मंत्रीपदाचा त्याग करणारा तू समाजासाठी निर्माण होईल का ?

रक्तात भीम म्हनून सांगने आहे …
तो आता रुजविला असता तर तुमची जमात राज्यकर्ति झाली असती …
भीमा तुझे स्वप्न होईल पूर्ण
फक्त होउद्या यांचा अभिमान जीर्ण ….
तुम्ही आले म्हणून मी लिहिले गती मिळाली…

आपल्या कार्याला मी जीवनही अर्पण केले तरी तुझे कार्यचा थोड़ाही अंश परतफेड होणार नाही ….
आपल्या कार्याला मानाचा मुजरा …
आजन्म मी झुकून आपल्या कार्याला आपल्या त्यागाला विनम्र अभीवादन करतो ..
– सचिन एम वाळके, गणेशपुर (ख)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.