ब्राह्मणी फाट्यालगत अपघात, एक जखमी

0

गिरीश कुबडे, वणी: वणी- चंद्रपूर महामार्गावर ब्राह्मणी फाट्यालगतच्या सेवन हिल धाब्यासमोर बुधवारी सकाळी 10च्या सुमारास अपघात झाला. लालगुडा मार्गाने भरधाव पीकअप वाहन वणीकडे येत असताना चालकाचे नियंत्रण सुटले. पीकअपने समोरून येणा-या दुचाकीवाहनला जोरदार धडक दिली. यात वाहनधारक जखमी झाला आहे.

बाईकचालक जानराव वाघळकर (60) रा. गोकुळनगर हे ब्राह्मणी फाट्यावरून जात असताना त्यांना मागून येणाऱ्या भरधाव पीकअप (एम. एच.36 एफ 2717) या वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकी वाहनधारक वाघळकर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

वाघळकर यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे. तर अपघातात भरधाव पिकअप वाहन चालकाला कोणत्याच प्रकारची इजा झालेली नाही. अपघातात पीकअप रस्त्याच्या कडेला पडल्याने त्यात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.