बहुगुणीकट्टा: आजची कविता ‘माणूसकी’

0
बहुगुणीकट्टामध्ये आजची कविता आहे ज्योतिबा पोटे यांची…
माणुसकी
झाला माणूस बेधुंद
झाले नाते त्याचे बंद
प्रवास विचाराचा
कसा झाला हा अरुंद..
पूर्वी संयुक्त कुटुंब
होता लेकुरवाळा वाडा
आज विभक्त कुटुंब
झाला महाल त्याचा सडा..
पूर्वी घट्ट पकडून होती
नात्या गोत्याची गुंफन
आज नात्यात देखावा
आतुन काटेरी कुंपन..
आई वडिलाची सेवा
वाटे पुत्रास  वचन
आज हयातीत लांच्छन
करते मेल्यावर पक्वानं..
पूर्वी भाऊबंधकीचा
होता आदर्श समोर
आज धुर्याबंधार्यावरुन
भावाभावा घनघोर..
या पूर्वीच्या जागेवर
दुर करा अहंकार
माणुसकी आता
तुम्हीच करा सहकार..
 -ज्योतिबा पोटे, मारेगाव.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.