शेतकऱ्यांची फसवणूक केल्या प्रकरणी सरकारवर गुन्हे दाखल करा

सुकाणू समितीची मागणी, मारेगाव पो.स्टे.ला निवेदन

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: कर्जमाफी, शेतमाला भाव इत्यादी विषयांवर सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. त्यामुळे सरकारवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी तालुक्यातील सुकाणु समितीच्या वतीने करण्यात आली. या प्रकरणी समितीच्या वतीने पो.स्टे मारेगाव येथे सहाय्यक पो.नि.राहुल कुमार राऊत यांना निवेदन सादर करण्यात आले.

सरकारने सातत्याने शेतकरीविरोधी धोरणे घेतली आहेत. सरकारच्या या धोरणांमुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे. शेतक-यांच्या या आत्महत्या म्हणजे खरे तर शेतक-यांच्या सरकारने केलेल्या हत्याच आहेत. कर्जमुक्त करताना सरकारने आपले आश्वासन व शब्द न पाळता अनेक अटी लावत शेतक-यांची घोर फसवणूक केली आहे. असा आरोप करत सुकानु समितीने सरकारवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

या पार्श्वभूमीवर सरकारवर फसवणुकीचा (कलम 420), शेतक-यांना आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा (कलम306) व शेतक-यांच्या हत्या केल्याचा (कलम 302) गुन्हा दाखल करावा अशी मागणी समितीने केली आहे.

यावेळी सुकाणू समिती मारेगाव तालुक्यातुन प्रमोद लडके विनोद ढोके, प्रफुल्लित आदे, श्रीकांत तांबेकर, कुंदन पारखी, विलास ढुमने, प्रवीण आडे,जगन कोवळे, पुंडलिक ढुमने, अजाबराव रामपुरे, बंटी कोवे, सुभाष पंधरे, पप्पु मडावी, विकास घुगुल ,बंडुजी गोळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

खाली क्लिक करू पाहा सुकानु समितीचे आंदोलन

Leave A Reply

Your email address will not be published.