बहुगुणीकट्टा: आज स्वप्निल पथाडे यांची कविता
आज बहुगुणीकट्टामध्ये स्वप्निल पथाडे यांची कविता…
“पहीला पाऊस”
निर्झर पावसात भिजताना
अन त्या ओल्या निरागस
शब्दांना पाहतांना
मन हे चिंबून ओलेस….
क्षणात अलगद मिटुन जावे
वाऱ्याच्या त्या झुळकीने
मग हळुच फिरुनी यावे
ते थेंब गार पाण्याने…
पाऊस हा पहिलाच होता
गंधळला हो मातीचा सुगंध
जसा नाट्यगृहातला श्रोता
त्यापरी होत होता मंत्रमुग्ध…
चहुबाजूंनी हा सैराट वारा
क्षितिजा पलीकडे फिरताना
मन होई तृप्त सम्राट भरारा
पक्षांचे मधुर संगीत ऐकताना…
✍स्वप्नील पथाडे (सम्राट)
मुकुटबन (9767728266)