जगती मायनिंग तर्फे कपडे वाटप आणि वृक्षारोपण

दिवाळी निमित्य लावले 2 हजार रोपटे

0

रफिक कनोजे, झरी: मुकुटबन पासून 6 किलोमीटरवर असलेल्या जगती मायनिंग तर्फे आगळी वेगळी दिवाळी साजरी करण्यात आली. कंपनीतर्फे कंपनीत कार्यरत असलेल्या कर्मचा-यांच्या मुलांना कपड्यांचे वितरण करण्यात आले. तसंच पर्यावरणाच्या संवर्धनासाठी दोन हजार वृक्ष लावण्यात आले.  वनविभागाच्या नर्सरीतून हे रोपटे आणले गेले. यात करंज, आंबा, गुलमोहोर, सप्तपर्णी इत्यादी झाडांचा समावेश आहे.

यावेळी खाण कामगारांना गणवेश हेल्मेट, जोडे, चष्मे इत्यादींचंं वाटप करण्यात आलं. यावेळी डायरेक्टर बोर्डाच्या अधिका-यांनी कर्मचा-यांना पर्यावरण आणि प्रदूषणाविषयी माहिती दिली. कर्मचा-यांची सुरक्षा आणि पर्यावरणाची निगा हे आमचं ध्येय असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.