प्रधानमंत्री आवास योजनेच्या निधीकरिता खासदारांकडे धाव

झरीच्या नगरपंचायत सदस्या शांताबाई जीवतोडे यांचा पुढाकार

0

सुशील ओझा, झरी: झरी नगरपंचायत अंतर्गत ३६ लोकांना दोन वर्षांपूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल मंजूर करण्यात आले. आवास योजनेची घरबांधकामाची परवानगीसुद्धा नगरपंचायतने दिली. योजनेचे घरकुल बांधकाम लोकांनी सुरू केले. स्लॅब लेव्हलपर्यंत काम झाले; परंतु दुसरा हप्ता नमिळाला नाही. सर्व बांधकाम ठप्प पडले आहे. त्यासाठी खासदार बाळू धानोरकर यांच्याकडे नगरपंचायत सदस्या शांताबाई जीवतोडे यांचा पुढाकारात मागणी झाली.

शासनाकडून बांधकामाचा पहिला टप्पा ४० हजार देण्यात आला. दुसरा टप्पा दोन वर्षे लोटूनही न मिळाल्याने अनेक लाभार्थी उघडयावर राहत आहे. काही लाभार्थी भाड्याच्या घरात राहत आहेत. पावसाळा सुरू असल्यामुळे उघड्यावर राहणाऱ्या लाभार्थींचे साप,विंचू आदींमुळे कुटुंबाला धोका निर्माण झाला आहे. तर लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनतेजवळ काम नसल्याने घराचे भाडे देणे कठीण झाले आहे . घरभाडे द्यायचे कुठून व जगायचे कसे असा गंभीर प्रश्नसुद्धा घरकुल लाभार्थी पुढे थाटला आहे.

घरकुल लाभार्थ्यांनी दुसरा हप्ता मिळावा याकरिता उपोषण केले. उपोषणादरम्यान ती समस्या सोडविण्याचे आश्वासन मिळाले. ते अजूनही पूर्ण केले नाही. झरी नागरपंच्यात अंतर्गत वॉर्ड क्र १७ मध्ये ९ घरकुल, ४ मध्ये ३,५ मध्ये २, १६ मध्ये ४,१३ मध्ये २ व १२ मध्ये ३ घरकुल मंजूर आहेत. हे सर्व लाभार्थी बांधकामाचा दुसरा हप्ता न मिळाल्याने त्रस्त झाले आहेत. घरकुल लाभार्थी यांनी जिल्हाधिकारी व नगरपंचायतचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना तक्रार देऊनही कोणताच उपयोग झाला नाही.

नगरपंचायतीमध्ये अध्यक्षांसह १९ नगरसेवक आहेत. तरीदेखील अजूनपर्यंत कोणीही घरकुल लाभार्थ्यांकडे लक्ष देत नसल्याने लाभार्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. अखेर आदिवासी गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांकरिता अपक्ष महिला नगरसेविका सरसावल्यात. पीडित घरकुल लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्याकरिता खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्याकडे धाव घेतली.

खासदार धानोरकर यांच्याकडे घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या मांडल्यात. न्याय देण्याची मागणी केली. खासदार बाळू धानोरकर यांनी थोडाही विलंब न करता पीडित घरकुल लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्याकरिता जिल्हाधिकारी यांना मोबाईलवरून समस्या सांगितली. सर्व घरकुल लाभार्थ्यांस दुसरा हप्ता मिळण्यास कार्यवाही करा असे पत्रसुद्धा पाठविले.

खासदारांच्या प्रयत्नामुळे ३६ घरकुल लाभार्थ्यांना दुसरा हप्ता मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्यात.
नगरसेविक शांताबाई जीवतोडे (कापसे) यांच्यासह गजानन मडावी, मारोती वेट्टी, रामदास मांडवकर, वंदना गेडाम, संगीता सोयाम, कमल येरेकर आणि श्रीक गोस्कुलवार उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.