सावधान… ! 13 शेतक-याच्या शेतात चोरट्यांचा डल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: मारेगाव (कोरंबी) येथील 13 शेतक-यांच्या शेतात चोरट्यांनी हात साफ केला. यात वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून लावलेली झटका मशिन व स्प्रिंकलर मशिनच्या नोझलचा समावेश आहे. या चोरीत चोरट्यांनी सुमारे 32 हजारांचे साहित्य लंपास केले. एकाच दिवशी चोरट्यांनी 13 शेतक-यांच्या शेतात डल्ला मारल्याने शेतकरी दहशतीत आले आहे. याबाबत वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की गजानन बाळकृष्ण चिव्हाने हे मारेगाव (कोरंबी) ता. वणी येथील रहिवासी आहे. त्यांचे मारेगाव कोरंबी शिवारात शेत आहे. मंगळवारी दिनांक 2 एप्रिल रोजी संध्याकाळी ते शेतातून घरी परत आले तेव्हा त्यांच्या शेतात झटका मशिन लावलेली होती. मात्र दोन दिवस पाऊस झाला. त्यामुळे ते शेतात गेले नाही. शुक्रवारी सकाळी ते शेतात गेले असता त्यांना त्यांच्या शेतात झटका मशिन (किंमत 4 हजार रुपये) चोरीला गेल्याचे आढळले. त्यांनी याबाबत गावात काही लोकांना माहिती दिली.

त्यानंतर इतर शेतक-यांनी शेतात जाऊन पाहणी केली असता आणखी 12 शेतक-यांच्या शेतातील स्पिंकलरचे नोझल चोरीला गेल्याचे आढळले. ज्याची किंमत 28 हजार रुपये आहे. चोरट्यांनी एकाच वेळी 13 शेतक-यांच्या शेतात चोरी केल्याने गजानन चिव्हाने यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात भादंविच्या कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सावधान… शेतात चोरट्यांचा डल्ला
याआधी अवजारे व शेतमाल चोरीला गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र अवघ्या काही तासात चोरट्यांनी सुमारे 13 शेतक-यांच्या शेतात डल्ला मारला आहे. त्यामुळे शेतकरी दहशतीत आले आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी आता शेतकरी करीत आहे.

हे देखील वाचा: 

Guardians of the Galaxy 3 – जगाला वाचवण्याची एक रोमांचक लढाई…

रविवारी सुप्रसिद्ध सर्जन डॉ. आशुतोष जाधव (MBBS, MS) यांची वणीत व्हिझिट

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.