इरशाद खान यांची वाहतूक सेनेच्या (मनसे) राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती

जितेंद्र कोठारी, वणी: महाराष्ट्र् नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून मनसेत असलेले निष्ठावान महाराष्ट्र सैनिक इरशाद खान यांची मनसेच्या राज्य वाहतूक सेनेच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनात बुधवारी मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस आरिफ शेख यांच्या हस्ते इरशाद खान यांना नियुक्त पत्र देण्यात आले.

इरशाद खान हे राजू उंबरकर यांच्या अतिशय निकटवर्तीय मानले जातात. पक्षाच्या स्थापनेपासून ते मनसे व राजू उबंरकर यांच्या सोबत आहे. अनेक आंदोलनात ते राजू उंबरकर यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतात. एका सर्वसामान्य महाराष्ट्र सैनिकाला थेट राज्य उपाध्यक्ष पद दिल्याने महाराष्ट्र सैनिकात उत्साहाचे वातावरण आहे.

परिसरातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार – इरशाद खान
एका सर्वसामान्य महाराष्ट्र सैनिकाची एवढ्या मोठ्या पदावर नियुक्ती होणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. अनेक वर्षांपासून पक्षासोबत एकनिष्ठ असल्याचे हे फळ आहे. राज्य पातळीवरील पद मिळाल्याने आता जबाबदारी देखील वाढली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्टच्या समस्या आहे. त्या सोडवण्याचा प्रयत्न राहणार.
– इरशाद खान, उपाध्यक्ष, मनसे वाहतूक सेना

इरशाद यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्र सैनिकात उत्साहाचे वातावरण आहे. भविष्यात परिसरातील वाहतुकीच्या समस्या देखील सोडवल्या जाईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.