नांदेपेरा मार्डी रस्त्यावरील जड वाहतूक 48 तासांपासून ठप्प
साईड देताना रस्त्याच्या खाली उतरले दोन ट्रक
भास्कर राऊत, मारेगाव: वणी नांदेपेरा मार्डी या मार्गावर नांदेपेरा ते मार्डी दरम्यान जड वाहतूक मागील 48 तासापासून ठप्प झाली आहे. फिस्कीच्या जंगलामध्ये 2 जड वाहने एकमेकांना ओलांडतांना रस्त्याच्या खाली उतरले. त्यामुळे दुचाकी व हलके वाहने वगळता मोठे वाहन निघणे कठीण झाले आहे. 2 दिवसांपासून वाहतूक ठप्प असताना बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मार्डी ते नांदेपेरा असे जवळपास 11 किमीच्या रस्त्याचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहेत. या रस्त्याचा काही भाग वनक्षेत्रात येत आहे. वनविभागाची परवानगी नसल्यामुळे जंगल भागातील रस्त्याचे रुंदीकरणाचे काम अर्धवट आहे. संबंधित कंत्राटदारांकडून उपलब्ध जुन्याच रस्त्यावर नवीन भर देऊन रस्त्याची उंची वाढवली जात आहे.
शनिवारी या मार्गावर समोरासमोर आलेले दोन ट्रक एकमेकांना साईड देताना रस्त्याखाली उतरले. त्यामुळे जवळपास 48 तासापासून वणी मार्डी मार्गावरील जडवाहतूक ठप्प झाली आहे. वणी नांदेपेरा मार्डी रस्त्याचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याची ओरडही वाहन चालक करीत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधकाम गुणवत्ताकडे लक्षं द्यावे. अशी मागणी नागरिक करीत आहे.
Comments are closed.