नितिन राऊत यांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता

ब्रिटीशांच्या भीतीने सुभाषचंद्र बोस यांना भेटण्यास हेडगेवारांनी दिला होता नकार

जितेंद्र कोठारी, वणी: प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ऊर्जामंत्री नितिन राऊत यांच्या विधानामुळे नवा वाद उत्पन्न झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसंघाचे माजी सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांनी ब्रिटीशांच्या भीतीमुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भेटण्यास नकार दिल्याचा दावा केला आहे. ऊर्जामंत्री नितिन राऊत सोमवार 24 जानेवारी रोजी वणी येथे कॉंग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात प्रमुख अतिथि म्हणून बोलत होते.

डॉ. हेडगेवार यांच्या नाशिक येथे मुक्काम असताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांच्या खाजगी सचिवाला निरोप देऊन हेडगेवार यांच्याकडे पाठविले. नेताजीचे खाजगी सचिव जेव्हा निरोप घेऊन हेडगेवार मुक्कामी असलेल्या ठिकाणी पोहचले व त्यांनी हेडगेवारच्या माणसांना संगितले की मला नेताजी यांनी पाठविले आहे. मला हेडगेवारांना भेटायचे आहे.

ती व्यक्तिने आत जाऊन हेडगेवार यांना संगितले की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निरोप घेऊन त्यांचे खाजगी सचिव आले आहे व त्यांना भेटायचे आहे. तेव्हा हेडगेवार यांनी त्याला संगितले की तू बाहेर जाऊन सांग की मी आजारी आहे, मला भेटायचा नाही. मी जर त्यांना भेटलो तर ब्रिटिश आमच्या सोबत काय करतील. मला जेलमध्ये टाकतील कदाचित. आणि दाराच्या बाहेर थांबलेले नेताजी यांचे खाजगी सचिवांनी त्या दोघांमध्ये होत असलेला संवाद ऐकत होते.

पुढे बोलताना नितिन राऊत म्हणाले की असे गुलाम लोक आता आपल्या शिकवावे लागले आहे. दुर्देवाने यांचे विचारसुददा विषारी झालेले आहे. माजी सरसंघचालक डॉ. हेडगेवार बाबत नितिन राऊत यांनी केलेल्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.