वणीतील भर वस्तीत चालणा-या सेक्स रॅकेटवर पोलिसांची धाड

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील सेवानगर परिसरात असलेल्या एका घरी पोलिसांनी धाड टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सेक्स रॅकेट चालवणारी महिला व एका ग्राहकाला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री 7.30 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

शहरातील सेवा नगर येथील एका घरात देहविक्री व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती सह. पोलीस निरीक्षक माया चाटसे यांना खबरी द्वारा मिळाली. मिळालेल्या माहितीवरून सोमवारी दिनांक 19 जून रोजी संध्याकाळी एपीआय माया चाटसे या पथकाला घेऊन सेवा नगर येथे गेल्या. तिथे रात्री 7.30 वाजताच्या सुमारास त्यांनी एका घरी धाड टाकली. तिथे दीपाली नामक वय 34 रा. वणी ही महिला घरी होती. पोलिसांनी बेडरुममध्ये धाड टाकली असता बेडरुममध्ये एक तरुण (29) रा. वणी व एक महिला (36) रा. नागपूर हे अर्धनग्न अवस्थेत आढळून आले. सदर महिलेची विचारपूस केली असता तिने ती नागपूरची असल्याची माहिती दिली.

देहविक्रीसाठी नागपूरची महिला वणीत
नागपूर येथील महिला ही पार्लरचा व्यवसाय करते. दीपालीने या महिलेला फोन करून माझ्याकडे अनेक कस्टमर असल्याची माहिती दिली. तसेच प्रत्येक कस्टमरकडून हजार रुपये घेते. त्यातील अर्धे पैसे प्रत्येक कस्टमरमागे देणार असा सौदा तिने तिच्याशी केला. सौदा पक्का होताच सदर महिला वणीमध्ये आली. दरम्यान आरोपी दीपालीने वणीतील एका तरुणाला मुलगी आणल्याचा कॉल करून घरी बोलावून घेतले. मात्र या व्यवसायाची माहिती पोलिसांना मिळाल्याने सेक्स रॅकेटचे बिंग फुटले. या घरी आरोपी दीपालीने सदर महिलेकडून 3 कस्टमर केले. त्याचे दीड हजार रुपये देखील नागपूरच्या महिलेला मिळाल्याचे चौकशीत समोर आले.

पोलिसांनी घराची झडती घेऊ नगदी 3 हजार रुपये, चार वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल ज्याची किंमत सुमारे 38 हजार, 5 निरोधचे पॉकेट्स असा एकूण 41, 350 रुपयांचा माल जप्त केला. सेक्स रॅकेट चालवणारी आरोपी दीपाली व वणी येथील 29 वर्षीय तरुणावर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमच्या कलम 4 व 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वणीत मोठ्या प्रमाणात सेक्स रॅकेट सुरू  !
वणी शहरातील अनेक नागरी वस्तीत मोठ्या प्रमाणात सेक्स रॅकेट सुरू आहे. रूम, ब्लॉक, फ्लॅट भाड्याने घेऊन तिथे देहविक्री व्यवसाय चालतो. काहींनी तर घरीच सेवा सुरू केली आहे. या व्यवसायात मोठ्या प्रमाणात वणीतील तसेच ग्रामीण भागातील तरुणी, महिला अडकलेल्या आहे. सोबतच काही दलाल देखील या व्यवसायात सक्रीय आहे. ग्राहकांची डिमांड लक्षात घेऊन अनेकदा चंद्रपूर, नागपूर, तसेच बाहेरगावाहूनही मुली सेवा देण्यास बोलावल्या जातात. इतर सेक्स रॅकेटचाही पर्दाफाश होणे गरजेचे आहे. 

सदर कारवाई ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात एपीआय माया चाटसे, दत्ता पेंडकर, पीएसआय हिरे, पोकॉ. सागर सिडाम, पोकॉ सुहास, वानोळे, विजय वानखेडे, इकबाल, सतोष कालवेलकर, विशाल यांनी पार पाडली. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.