सिटिजन जर्नालिस्ट: कळमणा येथील रस्त्याची दुरवस्था
पाहा सिटिजन जर्नालिस्ट दिनेश मडावी यांचा रिपोर्ट....
बहुगुणी डेस्क: सिटिजन जर्नालिस्ट… ज्याला नागरिक पत्रकार म्हटलं जातं. प्रत्येक व्यक्तिमध्ये एक पत्रकार दडला असतो. जो अनेकदा सोशल मीडियामधून, गप्पा गोष्टींमधून बाहेर पडत असतो. सर्वसामान्य व्यक्तींची जी पत्रकारिता असते त्याला सिटिजन जर्नालिजम म्हटलं जातं. आपणही तुम्हाला परिसरात ज्या घटना बातमी होऊ शकते असं वाटतं. त्या आम्हाला लिहून आणि व्हिडीओ शुट करून पाठवा. त्या आम्ही प्रकाशित करू…
(बातमी साठी संपर्क -निकेश जिलठे 9096133400 – बातमीआधी कॉल करणे गरजेचे)
आजची सिटिजन जर्नालिस्टमधली बातमी आहे कळमणा गावातील…
आजचे सिटीजन जर्नालिस्ट आहे. दिनेश मडावी. दिनेश वणी तालुक्यातील कळमणा येथील रहिवाशी आहे. कळमणा हे वणीपासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. या गावाच्या बाजुलाच कोळसा प्लॉट व कोल वॉशरी आहे. त्यामुळे इथे होणा-या अवजड वाहनामुळे या रस्त्याचे तीनतेरा वाजले आहे. पावसाळ्यात या रस्त्याची आणखीच बिकट परिस्थिती झाली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी गावक-यांकडून केली जात आहे.
पाहा सिटीजन जर्नालिस्टचा हा रिपोर्ट….