भरधाव कारची दुचाकीस धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

सणाच्या पूर्वसंध्येला काळाचा घाला, परिसरात हळहळ

जितेंद्र कोठारी, वणी: भरधाव कारने दुचाकीस्वारास जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तालुक्यातील झोल्या फाट्याजवळ संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. शुभम मंगाम असे मृत तरुणाचे नाव आहे. ऐन दस-याच्या पूर्वसंध्येला काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

सविस्तर वृत्त असे की शुभम मंगाम (27) हा कुचना येथील रहिवाशी होता. तो मंगळवारी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी संध्याकाळच्या सुमारास दुचाकीने (MH34 AK5302) कुचन्यावरून वणीच्या दिशेने जात होता. त्याच दरम्यान पजेरो ही कार (MH09 CJ 0700) वणी वरून नागपूरच्या दिशेने जात होती. संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास झोला फाट्याजवळ भरधाव कारने दुचाकीला जबर धडक दिली.

हा अपघात इतका गंभीर होता की अपघातात दुचाकीचा चुराडा झाला. तर कारचा समोरील भागाचेही नुकसान झाले. अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्याला जबर मार लागला. अती रक्तस्रानाने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. पोलीस ही घटनास्थळी पोहोलचे. पोलिसांनी कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा: 

लेफ्टनंट कर्नल वासूदेव आवारी यांचे चीनच्या सीमेवर कर्तव्य बजावताना निधन

आजपासून मयूर मार्केटिंगमध्ये (सोनी शोरूम) दसरा-नवरात्र ऑफर सुरू

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!