बेलोरा व चारगाव चौकीवर दारुची तस्करी करताना दोघांना अटक

शिरपूर पोलिसांची कार्यवाही, अवैध दारु तस्करांविरोधात पोलिसांची टाच

0

विवेक पिदूरकर, शिरपूर: अवैध दारू तस्करांवर शिरपूर पोलिसांनी फास आवळला असून गेल्या काही दिवसांमध्ये दारु तस्करांविरोधातील कार्यवाही वाढ झाली आहे. आज शुक्रवार दिनांक 18 डिसेंबर रोजी शिरपूर पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यात तस्करी होणा-या दोन दारू तस्करांवर कार्यवाही केली. दोन वेगवेगळ्या घटनेत झालेल्या कार्यवाहीत शिरपूर पोलिसांनी सुमारे पावने दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सविस्तर वृत्त असे की भद्रावती शास्त्रीनगर येथील रहिवाशी असलेला ऑटोचालक नासीर खा शाबस खा पठाण (38) हा त्याच्या ऑटोने (MH 40 P 1240) चंद्रपूर जिल्ह्यात दारू घेऊन जात होता. बेलोरा चौकी येथे ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनात दारु तस्करीविरोधात नाकेबंदी सुरू आहे. दरम्यान तिथे नासीर पोहोचला. शिरपूर पोलिसांच्या चमुने त्याच्या ऑटोची तपासणी केली असता त्याच्या ऑटोमध्ये मॅकडॉवल्स नंबर 1 या ब्रँडचे 144 पव्वे आढळून आले. पोलिसांनी दारूचे पव्वे ज्याची किंमत सुमारे 21600 व ऑटो किंमत 1 लाख रुपये असा सुमारे सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

दुस-या कार्यवाहीत नवीन वागदरा येथील राकेश भुपेंद्र रसाली (33) हा त्याची दुचाकी पॅशन प्रो (MH34 AQ 6130) गाडीने देशी दारुचे 72 नग घेऊन वणीहून चंद्रपूरच्या दिशेने जात होता. चारगाव चौकी येथे शिरपूर पोलिसांची नाकेबंदी आहे. दरम्यान आरोपी राकेश तिथे पोहोचला. तिथे थांबवून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी दारुचे 72 नग आढळून आले. पोलिसांनी त्याला अटक करत त्याच्याकडून 3744 रुपयांची दारू व 53744 रुपयांची मोटार सायकल असा सुमारे 57 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

दोन्ही आरोपींवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65 (अ) व (ई) नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सचिन लुटे, पोह दीपक गावंडे, नापोका प्रमोद जुनुनकर, सुगद दीवेकर, संजय खांडेकर, अमित पाटील यांनी केली.

हे देखील वाचा:

वणीत प्रतिबंधित व कामोत्तेजक औषधींची विक्री

हे देखील वाचा:

आज वणी तालुक्यात 9 रुग्ण

Leave A Reply

Your email address will not be published.