वणीत प्रतिबंधित व कामोत्तेजक औषधींची विक्री

शहारातील एका मेडिकलवर एफडीएची धाड

0

जितेंद्र कोठारी, वणी: प्रतिबंधित व कामोत्तेजक औषधींची अवैधरित्या विक्री करीत असल्यामुळे वणी येथील प्रिन्स मेडिकल या मेडिकल स्टोअरवर धाड टाकून प्रतिबंधीत औषध साठा जप्त करण्यात आला. अन्न व औषधी प्रशासन (एफडीए) यवतमाळ येथील औषध निरीक्षक श्रीमती स. भा. दातीर यांनी दि.11 डिसें. रोजी कारवाई केली. प्रशासनाने सदर मेडिकल स्टोअर पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.

वणी येथील कमान चौक परिसरात प्रिन्स मेडिकल आहे. या मेडिकल स्टोअरमधून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन (चिठ्ठी) शिवाय सवयी जडणाऱ्या व गुंगी आणणाऱ्या (प्रतिबंधित) तसेच कामोत्तेजनार्थ वापर होणाऱ्या औषधींची बेभाव विक्री होत असल्याची माहिती फूड अँड ड्रग विभागाला मिळाली. माहितीवरून ड्रग इन्स्पेक्टर दातीर यांनी शुक्रवार 11 डिसेंबर रोजी प्रिन्स मेडिकलमध्ये डमी ग्राहक पाठवून प्रतिबंधित अल्प्राजोलम (Alprazolam) टेबलेटची मागणी केली. ही औषधी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय देण्यास प्रतिबंध आहे.

दुकानदाराने डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय ग्राहकाला अल्प्राजोलाम गोळी दिली. सापळा यशस्वी होताच निरीक्षक दातीर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मेडिकल स्टोअरवर धाड टाकली. दुकानातील औषधसाठा तपासणी केले असता तिथून सुआग्रा, व्हायग्रा व इतर कामोत्तेजक औषधींच्या 300 गोळ्या व प्रतिबंधित अल्प्राजोलाम या गुंगीच्या औषधीच्या 357 टेबलेट आढळून आल्या.

मिळालेल्या औषधचे खरेदीचे बिल मागितले असता मेडिकल संचालक बिल देऊ शकले नाही. औषध निरीक्षक दातीर यांनी वरील औषधसाठा जप्त केला. तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधन कायदा 1940 व त्यातील नियमाप्रमाणे कारवाई करून पुढील आदेशपर्यंत दुकानातून खरेदी विक्रीचे व्यवहार बंद करण्याचे आदेश सहाय्यक आयुक्त (औषधी) म. वि. गोतमारे यांनी दिले.

प्रतिबंधित औषधी आली कुठून?
एफडीए कार्यालयाने 14 डिसें रोजी प्रिन्स मेडिकलचे मालक प्रकाश पांडे याना नोटीस पाठवून जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित व कामोत्तेजक औषधे कुठून व कोणाकडून खरेदी करण्यात आली, याचा पुराव्यासह खुलासा मागितला आहे. सदर औषधी खरेदीचे बिल सादर न केल्यास कलम 18-B नुसार कारवाई करण्याचेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. सदर केमिस्टने जप्त औषध बाबत योग्य खुलासा न केल्यास त्याच्याविरुद्ध पोलीस कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे.

नशेसाठी कफ सिरप व झोपेच्या गोळ्यांचा वापर
धकाधकीच्या जीवनात युवावर्ग झपाट्याने नशेच्या आहारी जात आहे. नशा करण्यासाठी युवक व अल्पवयीन मुलं कफ सिरप व गुंगी येणाऱ्या गोळ्यांचे वापर करत आहे. शहरातील अनेक मेडिकल स्टोरमध्ये कफ सिरप सहज मिळतो. अनेक मुलं ते जाऊन बिनदिक्कत विकत घेतात. तसेच अनेक लोक कामोत्तेजना वाढविण्यासाठी व्हायग्रा, सुआग्रा, कामाग्रा सारख्या कामोत्तेजक गोळ्यांचे वापर करीत आहे. या औषधींचे अती सेवन व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत होऊ शकते. आरोग्य विभाग व सामाजिक संस्थेनी याबाबत वेळोवेळी जागृती कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे.

हे देखील वाचा:

आज वणी तालुक्यात 9 रुग्ण

हे देखील वाचा:

वाघाची दहशत आणि वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

Leave A Reply

Your email address will not be published.