शामकी माता समाधीस्थळ मंदिराचे भूमिपूजन

उमरी खुर्द येथे अष्टमीला कार्यक्रम संपन्न

0 488

प्रतिनिधी, मानोरा: तीर्थक्षेत्र उमरी खुर्द येथे शामकी माता समाधीस्थळाच्या मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. दिनांक 12 एप्रिल रोजी म्हणजेच अष्टमीच्या दिवशी हा कार्यक्रम संपन्न झाला. जेतालाल महाराज मंदिर परिसरात दीड एकर जागेमध्ये शामकी मातेचे भव्य मंदिर तसेच भक्तनिवास उभारण्यात येणार आहे. याप्रसंगी दानशूर व्यक्तिमत्व भक्तीधाम पोहरादेवीचे निर्माते प्रसिद्ध उद्योगपती बंजारा भूषण किसन भाऊ राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महंत बाबुसिंग महाराज होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंतराव नाईक महामंडळाचे संचालक डॉ. श्याम जाधव (नाईक) यांनी केले. तर कार्यक्रमाचे संचालन श्री उदय पवार यांनी केले. संत जेतालाल महाराज मंदिर परिसरात शामकी माता समाधी स्थळी भव्य मंदिराचे निर्माण करिता महंत दादाराव महाराज यांनी जागा दिली. कार्यक्रमस्थळी त्यांचे आभार मानण्यात आले.

याप्रसंगी महंत जितू महाराज, रमेश महाराज, दादाराव महाराज, गोरख महाराज ,गोकुळ महाराज अभी महाराज, बाबुसिंग नाईक, विजय नाईक, रतन पवार, भीम नाईक, बळवंत राठोड, युवा उद्योजक पंडित राठोड, डॉ मोहन चव्हाण, हिरासिंग राठोड, सुभाष राठोड, प्रकाश वडते, विलास राठोड, जितू राठोड, विकल पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.

Comments
Loading...