वणीकरांना काहीसा दिलासा, आज 2 रुग्ण

शास्त्रीनगर व राजूरमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण

0

जब्बार चीनी, वणी: काल कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाल्यानंतर आज शुक्रवारी दिनांक 25 सप्टेंबर रोजी तालुक्यात 2 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमधले 1 व्यक्ती आरटी-पीसीआर टेस्टनुसार तर 1 व्यक्ती रॅपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आली आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये एक शास्त्रीनगर तर एक राजूर येथील व्यक्तींचा समावेश आहे. आज रुग्ण कमी आल्याने तालुक्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी आज मोजके रिपोर्ट प्राप्त झाल्याने हे आकडा कमी असण्याची शक्यता आहे.

आज यवतमाळहून 8 अहवाल प्राप्त झाले. यात 1 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 7 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. आज 26 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळ येथे पाठवण्यात आले. तर अद्याप 68 अहवाल येणे बाकी आहे. सध्या तालुक्यात एकूण 610 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 484 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात 107 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे मृत्यूची संख्या 15 झाली आहे.

आज 11 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी
आज कोरोना मुक्त झालेल्या 11 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 107 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 51 व्यक्तींवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 56 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 22 व्यक्तींवर उपचार सुरू आहे. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 60 व्यक्ती भरती आहेत.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!