मनभा येथे महाआरोग्य शिबिरात 200 रुग्णांची तपासणी

अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

0
Mayur Marketing

कारंजा: अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त मनभा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. संत श्री. डॉ रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्हीजेएनटी सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ श्याम जाधव (नाईक) यांच्या प्रमुख मार्गदर्शनात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत सुमारे 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी या रुग्णांना मोफत औषधीही देण्यात आली.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेची माहिती देताना डॉ. श्याम जाधव (नाईक)
Lodha Hospital

यावेळी मानभाचे सरपंच मिर्झा, उपसरपंच तायडे, मेडिकल ऑफिसर लकडे मॅडम, मेडिकल ऑफिसर जफर यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य हॉस्पिटलची चमु उपस्थित होती. फुले जनआरोग्य योजने अंतर्गत होणा-या या शिबिरात पिवळे तसेच केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबाला वार्षिक दिड लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले जाते. तसेच यात 971 प्रकारच्या आजार व 121 पाठपुरावा सेवांचा समावेश आहे. यामध्ये डायलिसीस, मेंदुविकार, हृदयरोग, हाडांचे आजार, किडनीचे आजार, कान-नाक-घशाचे आजार, महागड्या शस्त्रक्रिया यांचा समावेश आहेत. तसेच यात रुग्णांना मोफत औषधीही दिली जाते.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!